आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईकरांना दिलासा!:मुंबईत गुरुवारी नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांचे प्रमाण जास्त; रुग्ण सक्रिय होण्याचा प्रमाण 21 टक्क्यांवर

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईत आज कोरोनाचा आलेख काही प्रमाणात घसरतांना पाहायला मिळाला. राजधानी मुंबईत आज 13 हजार 702 नव्या कोरोनाबाधितांची भर पडली आहे. मुंबईत रुग्ण सक्रिय होण्याचा दर हा 21 टक्क्यांवर पोहोचला आहे. देशात देखील बुधवारच्या तुलनेत गुरुवारी कोरोना रुग्णांत 27.1 टक्क्यांनी वाढ पाहायला मिळाली.

कोरोना रुग्णवाढीत महाराष्ट्र अव्वलस्थानी

राज्यात गेल्या 24 तासात 46 हजार 723 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर देशाची राजधानी दिल्लीत 27 हजार 561 नव्या कोरोनाबाधितांची भप पडली आहे. पश्चिम बंगालमध्ये 22,155, कर्नाटकमध्ये 21,390 आणि तामिळनाडूत 17,934 कोरोना रुग्णांची भर पडली आहे.

देशात गेल्या 24 तासात 481 रुग्णांचा कोरोना उपचारादरम्यान दुर्दैवाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोना मृतांचा आकडा आतापर्यंत 4 लाख 84 हजार 859 इतका झाला आहे. गेल्या 24 तासात केरळमध्ये सर्वाधिक मृत्यूची नोंद करण्यात आली. केरळमध्ये 300 जणांचा मृत्यू झाला आहे. तर दिल्लीत 40 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात देशात 84 हजार 825 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे देशात आतापर्यंत 3 कोटी 47 लाख 15 हजार 361 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

ओमायक्रॉनचा आकडा पाच हजारांच्या पार

केंद्रीय आरोग्य विभाग आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील ओमायक्रॉन बाधितांचा आकडा पाच हजारांच्या पार गेला आहे. देशात आतापर्यंत एकूण पाच हजार 488 ओमायक्रॉन बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यात महाराष्ट्रात सर्वाधिक 1281 तर राजस्थानमध्ये 645 रुग्ण आढळले आहेत. त्यापाठोपाठ दिल्लीत 546, कर्नाटक 479, केरळ 350, पश्चिम बंगाल 294, उत्तर प्रदेश 275, गुजरात 236, तामिळनाडू 185 आणि हरियाणात 162 ओमायक्रॉन रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत आढळलेल्या ओमायक्रॉन रुग्णांपैकी 1805 रुग्णांनी ओमायक्रॉनवर मात केली असून, सध्या 3063 रुग्णांवर ओमायक्रॉनचे उपचार सुरू आहेत.

बातम्या आणखी आहेत...