आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना राज्यात:राज्यात आठ दिवसांत तासाला 12 मृत्यू, 2161 नवीन रुग्ण!; 9 ते 16 एप्रिलपर्यंत राज्यात 4 लाख नवे रुग्ण, 2,222 मृत्यू

मुंबई9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 81.12%, मृत्युदर 1.61%

महाराष्ट्रात कोरोनाचा कहर सुरूच आहे. गेल्या आठ दिवसांत म्हणजेच ९ ते १६ एप्रिल या कालावधीत राज्यात ४ लाख १५,०४४ नवीन रुग्ण वाढले आहेत. याच कालावधीत राज्याने २२२२ नागरिकांना गमावले आहे. या ८ दिवसांत राज्यात १ लाख ३,४३१ अॅक्टिव्ह रुग्णांची भर पडली आहे. या हिशेबाने राज्यात ८ दिवसांत तासाला १२ मृत्यू तर २१६१ नवे रुग्ण सापडले आहेत. शुक्रवारी राज्यात ६३,७२९ नवीन काेरोना रुग्ण, तर ३९८ मृत्यू झाले. दिवसभरात ४५,३३५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

राज्यातील एकूण रुग्णसंख्या आता ३७ लाख ३,५८४ वर पाेहोचली आहे. सक्रिय रुग्णांची संख्याही ६ लाख ३८,०३४ वर गेली आहे. एकूण मृतांची संख्या ५९,५५१ झाली आहे. राज्यातील एकूण कोरोनामुक्तांचा आकडा आता ३० लाख ४,३९१ झाला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१.१२%, तर मृत्युदर १.६१% इतका आहे. राज्यात १५ एप्रिलपर्यंत एकूण १ काेटी १५ लाख २१ हजार ३०० लाेकांचे लसीकरण करण्यात आले आहे.

मराठवाड्यात ७,६९८ नवीन पॉझिटिव्ह रुग्ण, १२३ मृत्यू
औरंगाबाद | शुक्रवारी मराठवाड्यात ७,६९८ रुग्ण, १२३ जणांचा मृत्यू झाला. ६,२०५ जणांची रुग्णालयातून सुटी झाली. सध्या ५५,८८४ जणांवर उपचार सुरू आहेत. रुग्ण व कंसात मृत्यू : औरंगाबाद १३८८ (२७), जालना ६४१ (३), परभणी ७३५ (१६), हिंगोली २३४ (५), नांदेड १३५१ (२५), लातूर १७६७ (२०), बीड १००५ (४), उस्मानाबाद ५८०

मे-जूनपर्यंत कोव्हॅक्सिनचे दुप्पट उत्पादन
नवी दिल्ली | कोव्हॅक्सिनचे उत्पादन मे-जूनपर्यंत दुप्पट आणि जुलै-ऑगस्टपर्यंत सहा ते सातपट केले जाईल. केंद्र सरकार लस निर्मितीच्या उत्पादन क्षमतेत विस्तारासाठी साहाय्य करेल. एप्रिलमध्ये एक कोटी डोस तयार होत असतील तर जुलै-ऑगस्टमध्ये दरमहा ६ ते ७ कोटी आणि सप्टेंबरपर्यंत १० कोटी डोसचे उत्पादन होईल.

  • उत्तर प्रदेशमध्ये रविवारी लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व शहरी आणि ग्रामीण भागांत आवश्यक सेवा वगळता सर्व बाजार-कार्यालये बंद राहतील.
  • हरियाणात शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग संस्था ३० एप्रिलपर्यंत बंद करण्यात आल्या आहेत. कार्यक्रम, आयोजनांत सहभागी होणाऱ्यांची संख्या मर्यादित असेल.
  • कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा (७८) यांना आठ महिन्यांत दुसऱ्यांदा कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

२.१ कोटी चाचण्या : राज्यात आजवर २ कोटी ३३ लाख ८,८७८ जणांच्या कोरोना चाचण्या झाल्या आहेत. त्यापैकी १५.८९ टक्के जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या ३५ लाख १४,१८१ जण होम क्वॉरंटाइन तर २५,१६८ जण संस्थात्मक क्वॉरंटाइनमध्ये आहेत.

विदर्भात गेल्या २४ तासांत १५३ मृत्यू, तर १४,५७७ नवीन रुग्ण
अमरावती | विदर्भात १५३ मृत्यू, १४,५७७ नवे रुग्ण आढळले. मृतांत पूर्व विदर्भातील १०९ जणांमध्ये नागपूरच्या ७५, भंडाऱ्याच्या १६ जणांचा समावेश आहे. पश्चिम विदर्भात ४४ जणांचा मृत्यू झाला. यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक २६ तर अकोल्यात ६ जणांचा मृत्यू झाला. नागपूर विभागात १०५०३, तर अमरावती विभागात ४०७४ नवे रुग्ण आढळले.

बातम्या आणखी आहेत...