आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना महामारी:राज्यातील लसीकरणासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुख्यमंत्री सहायता निधीत 2 कोटींची मदत

मुंबई6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते.

राज्यात सध्या लसीकरणाची मोहीम मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. दरम्यान, राज्याच्या मुख्यमंत्री सहायता निधीला मदत व्हावी म्हणून काँग्रेस पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसही पुढे सरसावली आहे. राज्याला कोरोनाविरद्धच्या लढ्यात बळ देण्यासाठी राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टतर्फे एक कोटी तर पक्षाच्या सर्व विधिमंडळ व संसद सदस्यांचे एक महिन्याचे वेतन असे एकूण दोन कोटी रुपये आज मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्यात आले. ही मदत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी करण्यात आली असून यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मदत करण्याचे आवाहन केले होते. राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या पक्षातील आमदार, खासदारांचा एका महिन्याचा पगार सीएम फंडासाठी दिला आहे. शरद पवार यांनी डिस्चार्ज मिळताच सर्व प्रथम आरोग्य यंत्रणेचा आढावा घेत निधी वाटप करण्याचे आदेश दिले होते.

बातम्या आणखी आहेत...