आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Corona Outbreak Updates: Shivsena Mp Sanjay Raut Demands Called For Special Session Of The Parliament T Disucss On Corona Virus Situation; News And Live Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अधिवेशन बोलवा:कोरोनामुळे देशात युद्धसदृश्य परिस्थिती, संसदेचे दोन दिवसीय अधिवेशन बोलवावे; खासदार संजय राउत यांची मागणी

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोनाचा संसर्ग देशात झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे लोकांना बेड्स, व्हेंटिलेटरदेखील मिळत नाही.

देशात कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे नवीन सक्रीय रुग्णांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दरम्यान, देशातील लोकांना बेड्स, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आणि अन्य अत्यावश्यक औषधांसाठी कठीण परिश्रम करावे लागत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचा खासदार संजय राऊत यांनी तातडीने दोन दिवसाचे संसदेचे अधिवेशन बोलवण्याची मागणी केली. देशात सध्याच्या अभूतपूर्व आणि युद्धसदृश परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी संसदीय अधिवेशनेच आयोजन करण्यास सांगितले आहे. यासंदर्भांत त्यांनी सोमवारी आपल्या सोशल मीडियावर हँडलवरुन माहिती दिली.

कोरोनाचा संसर्ग देशात झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे लोकांना बेड्स, व्हेंटिलेटरदेखील मिळत नाही. दुसरीकडे देशात 45 वर्षांवरील लोकांना लसीकरण सुरु आहेत. कोरोना महामारीच्या सध्याच्या परिस्थितीवरुन देशात गोंधळ सुरु असल्याचे त्यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवरुन सांगितले.

संजय राऊत यांनी ट्विटरवरुन हे शेअर केले
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सोमवारी ट्विटरवरुन ही माहिती शेअर केली असून त्यात " हे एक अभूतपूर्व आणि युद्धसदृश परिस्थिती आहे. देशात यावरुन सगळीकडे गोंधळ आणि तणाव दिसून येत आहे. लोकांना बेड्स, ऑक्सिजन मिळत नाही आहे. त्यामुळे यावर परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी तातडीने दोन दिवस संसदेच सत्र बोलावले जावे!
जय हिंद!"

बातम्या आणखी आहेत...