आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्र कोरोना:रविवारी रेकॉर्डब्रेक 9,518 रुग्णांची नोंद तर 258 मृत्यू; राज्यातील एकूण आकडा 3.10 लाखांवर

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस भयावहः होताना दिसत आहे. रविवारी(दि.19)राज्यात रेकॉर्डब्रेक 9,518 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यासोबतच राज्यातील एकूण संक्रमितांचा आकडा 3 लाख 10 हजार 455 झाला आहे. रविवारी 258 रुग्णांना कोरोनाने बळी घेतला, यासोबतच एकूण मृतांची संख्या  11,854 झाली आहे. सध्या राज्यात 1,28,730 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर 1 लाख 69 हजार 569 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यापूर्वी शनिवारी राज्यात 8,348 रुग्णांचे निदान झाले तर 144 बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. 

मुंबई पोलिस मुख्यालयात पोहोचला कोरोना

राज्यात मागील 24 तासांत 133 पोलिसांना कोरोनाची लागण झाली. तर 2 पोलिस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या पोलिसांत 19 पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. सध्या राज्यात 1489 पोलिसांवर उपचार सुरू आहेत. यात 124 अधिकारी आणि 1305 कर्मचारी आहेत. आतापर्यंत राज्यात कोरोनामुळे 87 पोलिसांचा मृत्यू झाला आहे, त्यात 7 अधिकारी तर 80 पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. 

मुंबई पोलिस मुख्यालयापर्यंत पोहोचला कोरोना 

वरिष्ठ रँकच्या एका आयपीएस अधिकाऱ्याला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळले आहे. मुंबई पोलिस मुख्यालयाने त्यांच्या ऑफिसला सॅनिटाइज केले. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे वरिष्ठ आयपीएस अधिकारी साथीचा प्रादुर्भाव रोखण्याच्या प्रयत्नात सक्रिय होते. त्याच्या ड्रायव्हर आणि काही कर्मचार्‍यांना हा संसर्ग झाल्याचे समोर आले होते. काही दिवसांपूर्वी या आयपीएस अधिकाऱ्याने मंत्रालयात एका बैठकीत सहभाग घेतला होता. तेथे गृह विभागाचे वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते. 

कोरोना'च्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी शरद पवार आज सोलापूर दौऱ्यावर

सोलापूर शहर व जिल्ह्यामध्ये कोरोना बाधितांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. यासोबतच मृतांचा आकडाही वाढत आहे.  दरम्यान कोरोनाला रोखण्यासाठी नुकताच सोलापूर शहर व परिसरातील काही गावांमध्ये दहा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यानंतर सोलापुरातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार आज सोलापूर शहराच्या दौऱ्यावर आहेत. 

राज्यातील 4.66 लाख कर्मचाऱ्यांनी ‘पीएफ’मधून उचलले 1650 कोटी

लॉकडाऊनच्या काळात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतून (पीएफ) राज्यातील 4 लाख 66 हजार कर्मचाऱ्यांनी 1650 कोटी रुपयांची रक्कम काढली आहे. त्यात मुंबईतील नोकरदारांची सर्वाधिक संख्या असून मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यांत येथून ३ लाख कर्मचाऱ्यांनी 1300 कोटींची उचल केली आहे. “वर्तमाना’त तगण्यासाठी “भविष्या’ची तरतूद असलेल्या ईपीएफमधून कर्मचाऱ्यांनी पैसे काढल्याचे चित्र आहे.

बातम्या आणखी आहेत...