आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना वॉर्डात दांडिया:कोरोना रुग्णांनी वार्डमध्ये खेळला दांडिया, पीपीई किट घालून हॉस्पीटल स्टाफने दिली साथ

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना काळात मुंबईतील दोन कोविड केअर सेंटरमधील व्हिडिओ व्हायरल होत आहेत. यात कोरोना रुग्ण हॉस्पीटल स्टाफसोबत कोरोना वॉर्डात दांडिया खेळताना दिसत आहेत.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये हॉस्पीटल स्टाफही पीपीई कीट घालून रुग्णांना साथ देताना दिसत आहे. सोशल मीडियावरील काही पोस्टनुसार, हा व्हिडिओ गोरेगावमधील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कोविड-19 केंद्रातील आहे.

रुग्णांच्या आनंदासाठी परवानगी दिली: बीएमसी

याबाब बीएमसी आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी सांगितले की, हा व्हिडिओ महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमधील आहे. या दांडियाचे हॉस्पीटलकडून आयोजन करण्यात आले नव्हते, रुग्णांनी स्वतःहून दांडिया खेळणे सुरू केले. रुग्णांना आनंद मिळावा म्हणून कोणीच त्यांना अडवले नाही.