आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

प्रथमच:मुंबईत आवाजातून पटेल कोरोना रुग्णांची ओळख, एआय सॉफ्टवेअरने घरबसल्या होईल चाचणी; 30 मिनिटांत निकाल

मनीषा भल्ला | मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • बीएमसीचा पथदर्शी प्रकल्प, 1000 जणांची मोफत चाचणी, ड्राय स्वॅबचे नमुनेही घेतले जातील
  • अमेरिकी कंपनी व्होकलिसचे तंत्र, विदेशात 85% पर्यंत सक्सेस रेट, या महिन्यापासून सुरुवात

देशात पहिल्यांदाच आवाजाच्या आधारे कोरोना चाचणी होणार आहे. बृहन्मुंबई नगर निगम (बीएमसी) एक हजार लोकांची पथदर्शी प्रकल्पाच्या आधारे अॅपद्वारे कोरोना चाचणी घेणार आहे. या चाचणीत निम्मे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असतील तर निम्मे कोरोना संशयित रुग्ण असतील. बीएमसीचे अतिरिक्त आयुक्त सुरेश ककानी सांगतात, इस्रायल आणि अमेरिकेमध्ये या तंत्रज्ञानाद्वारेच कोरोना चाचणी घेतली जात आहे. या महिन्यापासून सुरू होणारा पथदर्शी प्रकल्प यशस्वी ठरल्यास पुढेही याची अंमलबजावणी केली जाईल. व्होकलिस हेल्थ या अमेरिकेतील कंपनीकडून चाचणी सुरू आहे. भारतात आधीपासूनच काम करणारी ही कंपनी फार्मा आणि आयटी दोन्ही क्षेत्रात कार्यरत आहे. कोरोना चाचणीसाठी आवाज घेतलेल्या रुग्णांचा आरटीपीसीआर (ड्राय स्वॅबच्या प्रोटेक्टिव्ह ट्यूबमध्ये घेतलेले नमुने) चाचणीही होईल. यानंतर दोन्ही चाचण्यांचे परीक्षण केले जाईल. याद्वारे कोणती चाचणी जास्त अचूक आणि वेगवान निकाल देणारी आहे हे ठरवण्यात येईल. ही चाचणी आधीपासूनत इस्रायल आणि अमेरिकेत सुरू आहे. एखाद्याला कोरोनाची लागण झाली असल्यास त्याचा आवाज बदलतो, असे बीएमसीला वाटते.

पथदर्शी प्रकल्पांतर्गत सध्या ही चाचणी मोफत केली जात आहे. या चाचणीचे तंत्र विकसित करणारी व्होकलिस हेल्थ कंपनीचे सीईओ टाल व्हेंड्रिओ सांगतात, ही चाचणी केवळ सॉफ्टवेअरवर आधारित आहे. याच्या सर्व्हर आणि डेटा बँडविड्थमध्ये एकाच दिवसात अनेक चाचण्या घेण्याची क्षमता आहे. यासाठी कोणतीही मर्यादा नाही. हे सॉफ्टवेअर स्मार्टफोन किंवा टॅबमध्ये डाऊनलोड करावे लागेल. यात आपला रेकॉर्ड करावा लागेल. यानंतर ३० मिनिटांत चाचणीचा अहवाल मिळेल. हे सॉफ्टवेअर कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित आहे. याचा घरी, ऑफिसमध्ये किंवा प्रवासासाठी निघण्यापूर्वी स्वत:ची चाचणी घेण्यास फायदा होऊ शकतो. सुरुवातीची लक्षणे पडताळण्यासाठी ही चाचणी प्रभावी आहे. विदेशात ८५ टक्क्यांपर्यंत सकारात्मक परिणाम बघायला मिळाले आहेत.

आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी करण्यासाठी या पद्धतीचा वापर

व्होकलिसचे कंपनीचे सीईअो सांगतात, कोरोनामुळे आरोग्य यंत्रणेवर पडणारा ताण कमी करण्यासाठी जगभरात अनेक देशांकडून या पद्धतीचा वापर केला जात आहे. महाराष्ट्रात वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता, या तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. इस्रायल, अमेरिकेसह अनेक युरोपीय देशांमधील सरकारसोबत कंपनीने केलेला हा प्रयोग यशस्वी ठरला आहे.

0