आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:सौम्य लक्षणांच्या कोरोना रुग्णांना 5 दिवसांनी सुटी; विशेष कृती दलाचे नवे डिस्चार्ज धोरण

मुंबईएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
विशेष कृती दलाचे प्रमुख डॉ. संजय ओक - Divya Marathi
विशेष कृती दलाचे प्रमुख डॉ. संजय ओक
  • प्रकृतीनुसार ठरवणार उपचारांचा प्राधान्यक्रम

संतोष आंधळे

कोरोना संसर्ग झाल्यानंतर १४ दिवस शासकीय रुग्णालयात विलगीकरण कक्षात राहण्याची गरज नसून सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर औषधोपचार केल्यानंतर ५ दिवसांनी रुग्णालयातून घरी पाठवण्याचे नवे डिस्चार्ज धोरण आखण्यात आले आहे. मुंबईसह राज्यभरात लवकरच त्याची अंमलबजावणी होईल, अशी माहिती राज्य सरकारच्या कोरोनाविषयक विशेष कृती दलाचे प्रमुख डॉ. संजय ओक यांनी दिली. 

प्रख्यात बाल शल्यविशारद डॉ. ओक हे मुंबईतील प्रिन्स जहांगीर रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी असून मुंबईत कोरोनाच्या गंभीर रुग्णांवरील उपचाराची दिशा निश्चित करण्यासाठी स्थापन केलेल्या राज्य शासनाच्या विशेष कृती दलाच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. ओक यांनी ‘दिव्य मराठी’ला दिलेली विशेष मुलाखत. 

प्र. : तज्ज्ञ डॉक्टरांच्या विशेष कृती दलाचे नेमके स्वरूप काय असेल?

डॉ. ओक : सर्वप्रथम आमची ही टीम राज्यभरातील कोरोना रुग्णालयातील डॉक्टरांशी “हॉटलाइन’च्या माध्यमातून उपलब्ध असणार आहे. कोरोनाचा संसर्ग झाला म्हणजे आता १४ दिवस सरकारी रुग्णालयात ठेवण्याची गरज नसून, ज्याची लक्षणे सौम्य आहेत त्या रुग्णांना पाच दिवस रुग्णालयात ठेवून औषध उपचार देऊन घरी जाता येईल, असे नवे डिस्चार्ज धोरण आम्ही तयार केले आहे आणि लवकरच ते मुंबईसह राज्यातील सर्व रुग्णालयांत पाठवले जाईल. मात्र, या रुग्णांनी घरी स्वत:ला १४ दिवस क्वाॅरंटाइन केले पाहिजे. यावर आरोग्य कर्मचारी निगराणी ठेवून वेळोवेळी फॉलोअप घेतील.

प्र. : कोरोनाचे रुग्ण स्वत:हून पुढे का येत नाहीत?

डॉ. ओक : कोरोनाच्या या सर्व कोलाहलात सर्वसाधारण रुग्ण डॉक्टरांकडेच जायला घाबरत आहेत, कारण त्यांना भीती वाटत आहे की जर आपण चुकून बाधित निघालो तर आपली रवानगी थेट १४ दिवसांसाठी सरकारी रुग्णालयात होईल. मात्र, आता तशी भीती बाळगण्याचे कारण नाही. नवी मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत. 

प्र. : कोविड-१९ रुग्णालयाबद्दल काय सांगाल?

डॉ. ओक : आम्ही कोविड-१९ साठी जी स्वतंत्र रुग्णालये तयार केली आहेत तेथे न्यूस स्कोअरिंग (एनईडब्ल्यूएस ) नॅशनल अर्ली वॉर्निंग स्कोअर ही पद्धत अवलंबणार आहोत. या पद्धतीनुसार, जे रुग्ण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे त्या रुग्णाची प्रकृती किती खालावत चालली आहे यावर उपचारांचा प्राधान्यक्रम ठरवण्यात येणार आहे.

प्र. : प्रशासन व आरोग्य व्यवस्था यांचा ताळमेळ कसा साधणार?

डॉ. ओक : राज्यात विविध ठिकाणी स्वतंत्र कोविड रुग्णालय सुरू करणे, त्या रुग्णालयातील वैद्यकीय व्यवस्था, प्रत्येक रुग्णाला तो कोविडग्रस्त समजून उपचार सुरू करणे, चांगल्या सुसज्ज रुग्णवाहिका, कोविड आयसीयूमधील उपचार पद्धती यावर व आनुषंगिक उपचारांवर ही समिती देखरेखही ठेवेल तसेच सल्ला देईल.

बातम्या आणखी आहेत...