आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाराष्ट्रात अजून बिघडू शकते परिस्थिती:रिपोर्टमध्ये दावा - 2 मेपासून आयसोलेशन बेड, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर्सचा भासू शकतो तुटवडा

मुंबई17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 2 मे रोजी ठाणे जिल्ह्यांमध्ये 1,22,476 कोरोनाचे अॅक्टिव्ह केस असतील असा अंदाज

महाराष्ट्राच्या जास्तीत जास्त जिल्ह्यांमध्ये 2 मेला आयसोलेशन बेड, ऑक्सिजन, ICU आणि व्हेंटिलेटर्सचा तुटवडा भासू शकतो. मंगळवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीत याविषयावर चिंता व्यक्त करण्यात आली. मीटिंगमध्ये सादर करण्यात आलेल्या प्रोजेक्शन रिपोर्टनुसार, 2 मे रोजी ठाणे जिल्ह्यांमध्ये 1,22,476 कोरोनाचे अॅक्टिव्ह केस असतील आणि तेव्हा येथे 19,821 आयसोलेशन बेड, 4949 ऑक्सिजन बेड, 1237 ICU बेड आणि 432 व्हेंटिलेटर बेडची कमतरता होऊ शकते.

खरेतर, राज्याच्या आरोग्य विभागाने 2 मे रोजी राज्यात कोरोनाचे अॅक्टिव्ह केस किती असतील, याचा जिल्ह्यानुसार अंदाज लावला आहे. यानुसार, मंगळवारी मुंबईमध्ये जे कोरोनाचे 82,671 अॅक्टिव्ह पेशेंट आहेत, ते 76.68% वाढून, 1,46,064 अॅक्टिव्ह रुग्ण होतील.

महाराष्ट्राच्या 5 मोठ्या शहरांची अंदाजे स्थिती

शहर2 मेचे अंदाजे अॅक्टिव्ह रुग्णआयसोलेशन बेडऑक्सिजन बेडआईसीयू बेडव्हेंटिलेटर्स
मुंबई1460646837- 6433- 1477- 121
ठाणे122476-19821- 4949- 1237- 432
पुणे185162- 34528- 13118- 2240- 518
नाशिक68366-16314- 3654- 856174
नागपूर123680-32364-10476-1945-520

नोट- माइनस आकडा म्हणजे एवढी कमतरता भासेल

महाराष्ट्राच्या या शहरांमध्ये खराब होऊ शकते परिस्थिती
अशी परिस्थिती महाराष्ट्राच्या नागपूर, रायगड, पुणे, नंदूरबार, जालना, बीड, लातूर, परभणी, हिंगोली, वर्धा, भंडारा, गोंदिया आणि चेंद्रपूरमध्येही होण्याचा अंदाज आहे. नाशिक जिल्ह्यामध्येही अशी परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज लावला जात आहे. खरेतर येथे व्हेटिलेटर बेडची गरज पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

महाराष्ट्रातील कोरोना आकडेवारीमध्ये
गेल्या 24 तासांमध्ये नवीन प्रकरणे - 62,097
गेल्या 24 तासांत बरे झाले - 54,224
गेल्या 24 तासांत मृत्यू - 519
एकूण अॅक्टिव्ह प्रकरणे - 6,83,856
एकूण प्रकरणे - 39,01,359
एकूण रिकव्हरी - 32,13 464
एकूण मृत्यू - 61,343
एकूण टेस्टिंग - 2,43,41,736
टोटल रिकव्हरी रेट: 81.14%
टोटल डेथ रेट: 1.55%

19 दिवसांमध्ये 5,896 कोरोना रुग्णांचा मृत्यू
महाराष्ट्रात 1 ते 19 एप्रिलदरम्यान एकूण 10 लाख 85 हजार 196 कोरोना रुग्ण आढळले. आरोग्य डिपार्टमेंटनुसार, अशाप्रकारे राज्यात जवळपास नियमित 57,116 कोरोनाचे नवीन पेशेंट आढळले आहेत. या 19 दिवसांमध्ये एकूण 5896 लोकांचा मृत्यू झाला. म्हणजेच मृत्यूदर 0.54% राहिला.

बातम्या आणखी आहेत...