आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनाचा संसर्ग:मुख्यमंत्र्यांच्या घरापर्यंत पोहोचला कोरोना, ‘मातोश्री’शेजारचा बंगला सील

मुंबई10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एप्रिल महिन्यात ‘मातोश्री’ शेजारील एक चहावाला कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खासगी निवासस्थान असलेल्या वांद्रे येथील ‘माताेश्री’ बंगल्यापर्यंत कोरोनाचा संसर्ग पोहोचला आहे. मुख्यमंत्र्यांच्या घराशेजारी कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने महापालिकेचे धाबे दणाणले असून रुग्ण राहत असलेला शेजारचा बंगला सील करण्यात आहे.

एप्रिल महिन्यात ‘मातोश्री’ शेजारील एक चहावाला कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील १७० सुरक्षा कर्मचाऱ्यांचे विलगीकरण करण्यात आले होते. तसेच तेथील मधुसूदन कालेलकर मार्गही बंद करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...