आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Corona Remedesivir Upates: Shortage Of Remedesivir And Corona Vaccines In Beed District; Pankaja Munde Wrote A Letter To Health Minister; Newsa And Live Update

पंकजा मुंडे यांचे आरोग्यमंत्र्यांना पत्र:बीड जिल्ह्यात रेमडेसिवीर आणि कोरोना लसीचा तुटवडा; बीडच्या सत्ताधाऱ्यांना फक्त माफियांचे हित माहिती

मुंबई9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सरकारने बीडला दिले केवळ 20 डोस ; पालकमंत्र्यांचे लक्ष कुठे?

बीड जिल्हयात कोरोनाची स्थिती गंभीर बनली असताना रेमडेसिवर आणि कोरोना लसींचा मोठया प्रमाणावर तुटवडा जाणवत आहे. अशातच राज्य सरकारने बीडला केवळ 20 डोस दिले आहेत, यासंदर्भात भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी आरोग्यमंत्र्यांना पत्र पाठवून खेद व्यक्त केला आहे. दरम्यान, बीडमध्ये सत्ताधाऱ्यांना फक्त माफियांचं हित माहित आहे, जनतेच्या हितासाठी आम्ही लढण्यास तयार आहोत असेही त्यांनी म्हटले आहे.

सध्या कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून बीडमध्ये परिस्थिती चिंताजनक बनली आहे. आरोग्य विभागाच्या अहवालानुसार जिल्हयात आतापर्यंत 729 कोरोना पॉझ‍िटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर बाधितांची संख्या 35 हजाराच्या आसपास गेली आहे. एकीकडे आरोग्य यंत्रणा पुर्ण ताकदीने रूग्णांना मदत करण्यासाठी अहोरात्र काम करत असताना दुसरीकडे कोरोना रूग्णांसाठी लागणाऱ्या रेमडेसिवीरचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे, रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांना यामुळे फार मनस्ताप सहन करावा लागत आहे. लस देखील पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने लसीकरण केंद्र बंद पडली आहेत. एकूणच या प्रकाराने रूग्णसंख्या वाढीत भर पडत आहे.

लसीचे केवळ 20 डोस ; पालकमंत्र्यांचं लक्ष कुठे?
केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला आलेल्या 2 लाख डोसेस पैकी बीडला इतर जिल्हयाच्या तुलनेत केवळ 20 लसी मिळाल्या आहेत, ही अतिशय खेदजनक बाब असून पालकमंत्र्यांचं लक्ष कुठे? असा सवाल पंकजा मुंडे यांनी केला आहे. याकडे आपण गांभिर्याने लक्ष घालून पुरेसे डोसेस आणि इंजेक्शन उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी त्यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचेकडे पत्राद्वारे केली आहे.

बातम्या आणखी आहेत...