आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना:राज्यमंत्री विश्वजित कदम यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह; ट्विट करत दिली माहिती, संपर्कातील लोकांना कोरोना चाचणी करुन घेण्याची विनंती

मुंबई8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वैद्यकीय तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली कदम हे होम क्वारंटाइन झाले आहेत.

राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने होत आहे. दिवसेंदिवस रुग्णा संख्येमध्ये वाढत आहे. याच काळात अनेक राजकारण्यांनाही कोरोनाने विळखा घातला आहे. आता महाविकास आघाडी सरकारमधील कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांना करोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्विट करत याविषयी माहिती दिली. वैद्यकीय तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली कदम हे होम क्वारंटाइन झाले आहेत.

कोरोनाची किरकोळ लक्षण आढळल्यानंतर कदमांनी कोरोना चाचणी केली. यावेळी त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. शुक्रवारी त्यांचा कोरोना रिपोर्ट आला. यानंतर त्यांनी स्वतः ट्विट करत याविषयी माहिती दिली. यासोबतच संपर्कातील लोकांना कोरोना चाचणी करुन घेण्याची विनंतीही केली आहे.

विश्वजित कदम म्हणाले की, 'धावपळीच्या कारभारात योग्य ती वैद्यकीय खबरदारी घेत होतोच. परंतु अखेर मला कोरोना संसर्ग झालाच! थोडा ताप आणि अंगदुखी, अशी सौम्य लक्षणे दिसू लागल्याने काल चाचणी करून घेतली. आज त्याचा अहवाल आला आणि मी कोरोना पॉझिटिव्ह झालो. गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कृपया चाचणी करून घ्यावी, ही विनंती. माझ्या तब्येतीला धोका नाही. वैद्यकीय तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली घरीच विलगीकरणात मी उपचार घेत आहे. माझे कार्यालय नियमित सुरू असून मीदेखील फोन द्वारे उपलब्ध राहण्याचा प्रयत्न करीन.' अशी माहिती त्यांनी ट्विट करत दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...