आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई महापालिकेने कोरोनाच्या आरटीपीसीआर, अँटिजन चाचणीत मोठा भ्रष्टाचार केला असून चाचण्यांचे कंत्राट महापालिकेच्या प्रभाग अधिकाऱ्यानेच लाटल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मंगळवारी (१४ डिसेंबर) येथे केला. कोरोनाचा काळ हा शिवसेना आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांसाठी पैसे कमावण्याचा काळ ठरल्याची टीकाही सोमय्या यांनी केली.
सोमय्या यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत मुंबई महानगरपालिकेचे प्रभाग अधिकारी आणि सहायक आयुक्त मनीष वळंजू यांच्यावर आपले वडील तसेच मित्रांच्या नावे सुमारे १०० कोटी रुपयांचे कंत्राट मिळवल्याचा आरोप केला. वळंजू हे एल वॉर्डचे सहायक आयुक्त होते. सध्या ते ई वॉर्ड भायखळा येथे सहायक महापालिका आयुक्त आहेत. मनीष यांचे वडील राधाकृष्ण वळंजू यांनी २१ ऑगस्ट २०२० रोजी जेनेहेल्थ डायग्नोस्टिक्स प्रा. लि. कंपनीची स्थापना केली. महापालिकेने अवघ्या काही दिवसांत या कंपनीला ३० कोटींहून अधिक रकमेचे टेंडर दिले. आरटीपीसीआर, कोविड टेस्टिंग हे काम नवीन कंपनीला दिले. राधाकृष्ण वळंजू यांचा कोणताही व्यवसाय नाही. पूर्वीचा अनुभव नाही, वैद्यकीय तज्ज्ञ नाहीत. कंपन्या चालवण्याचा अनुभव नाही, तरीही कंपनीला काम देण्यात आल्याचा आरोप सोमय्या यांनी केला.
महापालिकेचे कंत्राट घेतल्याप्रकरणी मनीष वळंजू यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली असून या प्रकरणाची आणि महापालिकेने दिलेल्या कोरोना कंत्राटांची चौकशी करावी, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी या वेळी केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.