आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत कमी झाला कोरोनाचा वेग:​​​​​​​पॉझिटिव्हिटी रेट 28 टक्क्यांनी कमी होऊन 18.7 टक्क्यांवर, 83 टक्के रुग्णांमध्ये कोणतेही लक्षण नाहीत

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

देशाची आर्थिक राजधानी मुंबईत सलग चौथ्या दिवशी कोविड रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. मंगळवारी मुंबईतील कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हिटी दर 28 टक्क्यांवरून 18.7 टक्क्यांवर आला. सोमवारी अधिक चाचण्या असूनही, प्रकरणे कमी झाली आहेत. सोमवारी 13,648 नवीन प्रकरणांची नोंद झाली, तर मंगळवारी 11,647 प्रकरणे नोंदवली गेली. यापैकी 9,667 (83 टक्के) मध्ये कोणतीही लक्षणे नाहीत. सोमवारी पॉझिटिव्हिटी दर 23.03% होता. मंगळवारी दोन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

तिसरी लाट लवकरच स्थिर होऊ शकते: तज्ज्ञ
महाराष्ट्र कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी म्हणाले की, मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या विक्रमी पातळीवर पोहोचली आहे आणि कोविड-19 ची तिसरी लाट लवकरच स्थिर होऊ शकते. जोशी पुढे म्हणाले की, आम्हाला या आकडेवारीत आणखी घसरण अपेक्षित आहे. डॉ शशांक जोशी पुढे म्हणाले की, पूर्वी अहवालात 25 टक्के पॉजिटिव्हिटी दर दाखवला गेला होता. आम्ही ती संख्या कमी होण्याची अपेक्षा करत आहोत. डॉ. शशांक जोशी यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या तीन ते चार दिवसांत त्यांनी एक ट्रेंड पाहिला आहे, ज्यावरून असे दिसून येते की तीन कारणांमुळे केसेसची संख्या कमी झाली असावी.

कमी केस येण्यामागेर हे होऊ शकते कारण

  • पहिले : खूप लोक घरी आहेत आणि सेल्फआयसोलेशनमध्ये आहेत आणि टेस्ट करुन घेत नाहीतेय.
  • दुसरे : खूप लोक आपली सेल्फ टेस्ट करत आहेत, पण ते नोंद करत नाहीयेत.
  • तिसरे : असे होऊ शकते की, आपल्याला योग्य संख्येची अजिबात माहिती नाही.

'संडे इफेक्ट'मुळे केसेस कमी झाल्या आहेत का?
महाराष्ट्र आणि मुंबईतील कोरोना संसर्गाच्या आकडेवारीत सोमवारी घट झाली. मुंबईत कमी रुग्ण मिळण्याला तज्ज्ञ 'संडे इफेक्ट'चे नाव देत आहेत. त्याच वेळी, काही तज्ञ हे एक चांगले संकेत मानत आहेत. मुंबईत सोमवारी संसर्गाच्या प्रकरणांमध्ये 30 टक्क्यांनी घट नोंदवण्यात आली आहे. शहरात 13 हजार 468 नवीन रुग्ण आढळले आहेत. रविवारी हा आकडा 19 हजार 474 वर पोहोचला होता.

7 जानेवारीपासून ही आकडेवारी कमी होत आहे
कोरोनाच्या आकडेवारीनुसार, 7 जानेवारीपासून मुंबईतील प्रकरणांमध्ये घट होत आहे. शुक्रवारी शहरात 20 हजार 971 रुग्ण आढळले होते, जे 8 जानेवारी म्हणजेच शनिवारी 20 हजार 318 वर आले. रविवारी हा आकडा 19 हजार 474 एवढा होता. सोमवारी नवीन बाधितांच्या संख्येत मोठी घट झाली. ही घसरण 13 हजार 648 वर आली.

BMC ने कोरोना लढ्यात खर्च केले 3,000 कोटी
कोरोनाविरुद्धच्या लढाईत बृहन्मुंबई महापालिकेचा खर्च सुमारे 3 हजार कोटींवर पोहोचला आहे. बीएमसीने आकस्मिकता निधीतून 300 कोटी रुपये काढण्याची पुन्हा मागणी केली आहे. प्रशासनाने याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. यापूर्वी आकस्मिकता निधीतून 400 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.

बातम्या आणखी आहेत...