आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरानाचा हाॅटस्पाॅट:मुंबईत गोलमाल; चाचण्या मर्यादित ठेवत संसर्ग नियंत्रित केल्याचा दावा

मुंबई ( अशाेक अडसूळ )10 महिन्यांपूर्वीलेखक: प्रवीण पवार
  • कॉपी लिंक
  • उर्वरित महाराष्ट्रातील चाचण्या वाढल्याने मुंबईचा वाटा घटला

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा लाखाच्या पुढे गेला असून त्यात निम्मा वाटा मुंबईचा आहे. मुंबई कोरानाचा हाॅटस्पाॅट ठरली असतानाच आरोग्यमंत्री व पालिका प्रशासन मात्र कोरोना ग्राफ कर्व्ह केल्याचा दावा ठोकत आहेत. यामुळे चाचण्यांची संख्या मर्यादित ठेवून गोलमाल सुरू असल्याचा आरोप केला जात आहे.

मार्चमध्ये राज्यातील रुग्णसंख्येत मुंबईचा वाटा ७२% हाेता. मेमध्ये तो ६०% झाला. जूनमध्ये हा वाटा ४४% इतका खाली आला. यामुळे मुंबईत रुग्णसंख्या घटल्याचा दावा पालिका करत आहे. १ मे रोजी राज्यातील ७३२७ कोविड चाचण्यांपैकी ४००० मुंबईच्या हाेत्या. त्यानंतर उर्वरित राज्यात कोरोना लॅब उभ्या राहिल्या. परिणामी, चाचण्यांची संख्या वाढली. २३ मेदरम्यान उर्वरित महाराष्ट्रात दररोज १० हजार चाचण्या होत असताना मुंबईत ४००० होत होत्या. ९ जून रोजी उर्वरित महाराष्ट्रात ११९६५ चाचण्या झाल्या, त्या वेळी मुंबईत ४६५० चाचण्या झाल्या.

चाचण्या कमी का? ही चार महत्त्वाची कारणे...

१. पूर्वी २ चाचण्या निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णास घरी सोडले जाई. आता एक्स-रे, ऑक्सिजन पातळीत सुधारणा झाल्यास चाचणीविना घरी सोडतात.

२. प्रसूतीसाठी येणाऱ्या गर्भवतींची पूर्वी सक्तीने चाचणी केली जाई. आता तशी आवश्यकता नाही.

३. कोराेनाची लक्षणे नसलेल्या किंवा अतिसौम्य लक्षणे असलेल्या संशयितांची चाचणी करत नाही.

४. कोरोना चाचणीसाठी डाॅक्टरांकडून शिफारस यावी लागते.

लबाड रणनीती : फडणवीस 

१ मेदरम्यान मुंबईत ५६% चाचण्यांत २१% रुग्ण सापडत. ३१ मेदरम्यान ३२% रिपोर्ट पाॅझिटिव्ह येऊ लागले. चाचण्यांची संख्या मात्र २७% खाली आणल्याचे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई मनपाची रणनीती लबाडीची असल्याचा आरोप केला आहे.

रोज ५० हजार चाचणी क्षमता, मात्र वापर नाही

राज्यात शुक्रवारपर्यंत ६,२६,५२१ चाचण्या झाल्या. त्यात मुंबईत २,४७,६९६, तर उर्वरित राज्यात ३,७८,८२५ चाचण्या झाल्या. देशात सर्वाधिक चाचण्या आम्ही घेत असून मुंबईचा दर प्रती दशलक्ष १६,३०४ इतका असल्याचे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. राज्यात कोरोना चाचण्यांच्या ९५ लॅब्ज असून त्यांची प्रतिदिन क्षमता ५० हजार आहे. त्यांच्या पूर्ण क्षमतेने वापर न करताच आकड्यांचा जुगाड करत कोराेनावर नियंत्रण मिळवल्याचे दाखवले जात आहे.

महिना   रुग्ण  चाचण्या

३१ मार्च  १८७ १३१०

३० एप्रिल  ३६२ ४०८७

३० मे  १४७२ ३७३९

११ जून  १५४० ४७७३

बातम्या आणखी आहेत...