आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कोरोना चाचणी:आता आवाजावरुन केली जाणार कोरोना चाचणी, मुंबई महापालिकेचा नवा प्रयोग, नेस्को जम्बो कोरोना केंद्रात घेतले जाणार आवाजाचे नमुने

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना चाचणी म्हटलं की, स्वॅब घेतले जाणार हे आपल्याला माहिती आहे. पण आता चक्क आवाजावरुनही कोरोना रुग्णाची ओळख होणार आहे. कोरोना संसर्गाच्या तपासासाठी अँटिजन आणि अँटिबॉडी तपासणीनंतर मुंबई महापालिकेने आता आवाजाची तपासणी करण्याचाही निर्णय घेतलाय. या नव्या प्रयोगातमध्ये ध्वनी लहरींवरुन कोरोना पॉझिटिव्ह किंवा निगेटीव्ह असल्याचे निदान केले जाऊ शकते, अशी माहिती मुबई महापालिकेकडून देण्यात आली आहे.

आता या चाचणीसाठी नेस्को जम्बो कोरोना केंद्रामध्ये हजार रुग्णांच्या आवाजाचे नमुने घेतली जातील. कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर आवाज बदलतो असे वैद्यकीय तज्ज्ञांचे निरिक्षण आहे. या विषाणूचा स्वरयंत्रणेवर कशा प्रकारचा परिणाम होतो, कोरोना झाल्याची लक्षणे असतील तर आवाजावर परिणाम होऊ शकतो का, या सर्व दृष्टींनी विशेष अभ्यास केला जाणार असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.

आाजाच्या चाचणीमध्ये केवळ 30 मिनिटांमध्ये कोरोना विषाणूची लागण झाली आहे की नाही याचे निदान होणार आहे. या चाचणीत जे पॉझिटिव्ह आढळतील त्यांचे आरटीपीसआर चाचणीने निदान पक्के केलं जाणार असल्याचंही महापालिकेने सांगितलंय.

यामुळे घेतला जाणार आवाज एखाद्या व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणं दिसतात तेव्हा त्यांना श्वासनाचा त्रास होतो. या सर्व प्रक्रियेमध्ये फुफ्फुसांच्या स्नायूंवर प्रभाव पडतो. स्नायूंना सूज येते. त्यामुळे आवाजही बदलतो. आवाजावर परिणाम झाल्यामुळे त्यात बदल होतो आणि याच बदललेल्या आवाजाला मोजण्यात येते आणि त्यातून त्या व्यक्तिला कोरोना झाला की नाही हे तपासले जाऊ शकते.