आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Corona Testing Of Teachers At Government Expense, Testing Will Be Done Free Of Cost At The Government Center, The Cost Of Corona Prevention Measures Will Be Borne By The Government

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिक्षकांची कोरोना चाचणी सरकारी खर्चानेच:शासकीय केंद्रात मोफत केली जाणार कोरोना चाचणी, कोरोना प्रतिबंध उपाययोजनांचा खर्च सरकार करणार

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • इयत्ता 9 वी, 12 वीचे वर्ग 23 नोव्हेंबरपासून होणार सुरू, मार्गदर्शक सूचना जारी

राज्यातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कोरोना चाचणीची सोय स्थानिक प्रशासन करणार असून शासकीय केंद्रात आरटीपीसीआर चाचणी मोफत करण्यात येणार आहे. तसेच शाळांतील कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा सर्व खर्च स्थानिक प्रशासन उचलणार असल्याचे पत्र राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने मंगळवारी जारी केले आहे.

मंगळवारपासून शिक्षक - शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यास सुरुवात केली जाणार होती. मात्र शालेय शिक्षण विभागाच्या संदिग्ध सूचनांमुळे शिक्षकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते.

अखेर शालेय विभागास आज जाग आली आणि विभागाच्या सचिव वंदना कृष्णा यांनी पत्र जारी केले असून, चाचणीसंदर्भात तसेच कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांच्या खर्चाबाबत स्पष्ट आदेश दिले आहेत.

इयत्ता ९ वी, १२ वीचे वर्ग २३ पासून होणार सुरू

शासनाने सर्व शाळेत इयत्ता ९ वी १२ वीचे वर्ग २३ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना दिल्यात.

बातम्या आणखी आहेत...