आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनाचा परिणाम:मुंबईच्या जामा मशिदीत 5 वेळा सामूहिकनमाजाची मागणी हायकोर्टाने फेटाळली, न्यायमूर्ती म्हणाले, परिस्थिती गंभीर, नागरिकांची सुरक्षा महत्त्वाची

मुंबई9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एका वेळी ७ हजार लोकांची क्षमता

रमजान काळात दक्षिण मुंबईतील जामा मशिदीत लोकांना नमाज अदा करण्याची परवानगी देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. कोविड-१९ मुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. नागरिकांची सुरक्षा ही अधिक महत्त्वाची आहे, त्यामुळे मशिदीत सामूहिक नमाज अदा करण्याची परवानगी देता येऊ शकत नाही, अशा शब्दांत सुटीतील न्यायमूर्तीद्वय आर.डी. धानुका आणि व्ही.जी.बिश्त यांनी जुम्मा मशीद ट्रस्टची मागणी फेटाळून लावली. रमजान महिना असल्याने मुस्लिम समुदायातील नागरिकांना जामा मशिदीत पाच वेळा नमाज अदा करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी ट्रस्टच्या याचिकेत करण्यात आली होती. या वेळी शासनातर्फे अतिरिक्त अधिवक्ता ज्योती चव्हाण यांनी युक्तिवाद केला. सध्याच्या काळात राज्य शासन कोणतीही जोखीम पत्करण्याच्या मन:स्थितीत नाही. विशेषत: आगामी १५ दिवस कोणत्याही धर्मासाठी सवलत देऊ शकत नाही. धार्मिक कार्ये करण्यास अटकाव नाही; परंतु प्रत्येकाने ती आपापल्या घरी करावीत, अशी भूमिका शासनातर्फे मांडण्यात आली.

एका वेळी ७ हजार लोकांची क्षमता
दक्षिण मुंबईत जामा मशिदीचा एक एकरचा विस्तीर्ण परिसर असून त्यात ७ हजार लोक एकाच वेळी सामूहिक नमाज अदा करू शकतात. कोरोनामुळे एका वेळी केवळ ५० जणांनाच प्रार्थना म्हणण्यास परवानगी देण्यात आली आहे, असे याचिकेत नमूद करण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...