आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यात गेल्या 24 तासांत 3 हजार 626 नवीन कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, कोरोनामुळे राज्यात एका दिवसात 37 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे, राज्यातील मुंबई आणि नागपूरमध्ये सतत नवीन रुग्णांमध्ये वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी नागपुरात तर मुंबईच्या महापौर किशोरी पेढणेकर यांनी मुंबई कोरोनाची तिसरी लाट आली असल्याचा दावा केला आहे. या इशाऱ्यामुळे राज्यातील लोकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. दोन्ही शहरात गेल्या काही दिवसांपासून प्रकरणात वाढ होत असल्याने त्यांनी हा दावा केला असल्याचे सांगण्यात येत आहे.
मुंबईत कोरोनाची तिसरी लाट दाखल - महापौर
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या नवीन प्रकरणात वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर महापौर म्हणाल्या की, मुंबईत कोरोनाची तिसरी लाट येत नाही तर आली आहे असा दावा किशोरी पेढणेकर यांनी केला आहे. कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी कडक निर्बंध लावण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे. त्यामुळे गरज पडल्यास मुख्यमंत्री याबाबत निर्णय घेतील असही त्या म्हणाल्या. दरम्यान, लोकांनी स्वत:ची काळजी घेत, घरीच राहून गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे.
नागपुरात कडक निर्बंधात वाढ होण्याची शक्यता - उर्जामंत्री
नागरपुरातील सध्यस्थितीवरुन उर्जामंत्री नितीन राऊत यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा दावा केला आहे. याच पार्श्वभूमीवर कोविड आपत्ती व्यवस्थापन दलाची बैठक लवकरच बोलवण्यात येणार आहे. या बैठकीमध्ये नागपुरात कडक निर्बंध लागू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. परंतु, हा निर्णय स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन घेतला जाईल असेही राऊत यांनी बोलताना सांगितले. ते पुढे म्हणाले की, विदर्भात ऑगस्ट महिन्यापासून कोरोनामुळे एकही मृत्यू नाही. नागपुरात 17 ऑगस्टपासून सर्व निर्बंध शिथील करण्यात आले होते. परंतु, आता जिल्ह्यातील कोरोनाचे वाढते प्रकरण पाहता हे निर्बंध कायम केले जाईल असेही ते म्हणाले.
गणेशोत्सवाची तयारी करणाऱ्यांनी कोविड नियमाचे पालन करावे - आरोग्यमंत्री
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, 'केरळमध्ये ओणम सणावेळी गर्दीमुळे कोरोनाच्या नवीन प्रकरणांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. हे पाहता गणेश विसर्जनाची तयारी करणाऱ्या लोकांनी कोरोना नियमांचे पालन करावे असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.
गेल्या 24 तासात कुठे किती रुग्ण आढळले
राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना महामारीचा प्रार्दुभाव वाढत आहे. दरम्यान, गेल्या 24 तासांत म्हणजे सोमवारी राज्यात 1 हजार 267 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये मुंबईत 728, नाशिक 953, कोल्हापूर 517, नागपूर विभागात सर्वात कमी 14 कोरोना पॉझिटिव्ह आढळले. राज्यात सध्यातरी कुठेही कोरोना निर्बंध लागू करण्याचा विचार नसल्याचे आरोग्यमंत्र्यांनी म्हटले आहे. परंतु, कोरोनाचे प्रकरण वाढताच हे निर्बंध लादले जाऊ शकतात असेही ते म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.