आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनाचा विळखा:खासदार नवनीत राणांची प्रकृती बिघडल्याने मुंबईत हलवले

अमरावतीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना पॉझिटिव्ह असल्याने नागपुरातील वोक्हार्ट रुग्णालयात उपचार घेत असलेल्या खासदार नवनीत राणा यांच्या फुप्फुसात इन्फेक्शन झाल्यामुळे त्यांना श्वसनास त्रास होऊ लागला. डाॅक्टरांनी तत्काळ मुंबईला उपचारासाठी पाठवण्याचा निर्णय घेतला. विशेष रुग्णवाहिकेद्वारे खासदारांना रस्तेमार्गे मुंबईत पाठवण्यात आले. स्वत:च्या प्रकृतीची काळजी न करता आमदार राणाही त्यांच्यासोबत रवाना झाले आहेत. दुपारी विशेष रुग्णवाहिका मुंबईकडे निघाल्याचे खासदारांच्या जनसंपर्क विभागाने सांगितले.

कुटुंबातील 12 जण पॉझिटिव्ह

नवनीत राणा यांच्या मुला-मुलीसह 10 जणांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर आली होती. यानंतर नवीनत राणाही कोरोना पॉझिटिव्ह आल्या. त्यांच्या पाठोपाठ त्यांचे पती आमदार रवी राणा यांनाही संसर्ग झाला होता. सासु-सासऱ्यांसह त्यांच्या कुटुंबातील 12 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

सुरुवातीला अमरावतीत सुरू होते उपचार

नवनीत राणा यांची तब्येत बिघडल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये चिंता वाढली आहे. नवनीत राणा यांना कोरोनाचे निदान झाल्यानंतर त्यांना अमरावतीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र अचानक त्यांची तब्येत बिघडली नंतर त्यांना नागपूरच्या ओखार्ट हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र आता श्वास घेण्यास अडचण होत असल्याने त्यांना उपचारासाठी मुंबईला हलवण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...