आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोटाला चिमटा, परतीचे संकट:मुंबईहून मोठ्या प्रमाणात मजुरांचे पलायन सुरू; लॉकडाऊनच्या भीतीने दिल्लीहून स्थलांतर

9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रेल्वेत जागा नसल्यास ऑटोने गाव गाठताहेत

कोरोनामुळे गेल्या वर्षी स्वातंत्र्योत्तर काळातील सर्वात मोठ्या स्थलांतराचे घाव अद्याप भरलेही नाहीत तोच पुन्हा महानगरांतून हे संकट आेढवले. पाठीवर आेझे घेत नाइलाजाने गावाकडे परतणाऱ्या लोकांचे हताश चेहरे खूप काही सांगतात. मुंबई असो की दिल्ली, रेल्वे आणि बसस्थानकांवर खूप गर्दी पाहायला मिळतेय. रोज हातावर कमावणाऱ्या लोकांसाठी कोरोनाऐवजी लॉकडाऊन हा शब्द त्यांना भीती घालणारा ठरला आहे. जीवनाच्या संघर्षात एकीकडे पोट आणि संसर्गाची भीती यामुळे हे लोक लवकरात लवकर घर गाठू इच्छितात.

काही दिवसांपासून सुरतहूनदेखील मजुरांचे पलायन सुरू आहे. लोकांमध्ये लॉकडाऊनची प्रचंड भीती दिसते. लोक दुप्पट बसभाडे मोजून गाव गाठू लागले आहेत. लॉकडाऊन लागू होणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले तरीही लोक दहशतीत आहेत. कारण गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनमधील वेदना ते अद्यापही विसरू शकलेले नाहीत.

नागपूर }काही कंपन्या बंद, काहींमध्ये छाटणी
संसर्गामुळे लोकांमध्ये लॉकडाऊनची भीती आहे. आैद्योगिक क्षेत्र मिहान, बुटीबोरी, हिंगणा, उप्पलवाडीत २५०० कंपन्या आहेत. त्यापैकी सुमारे ४० टक्के लोक इतर राज्यांतील आहेत. बहुतांश गावी परतू लागले आहेत. त्यामुळे बस,रेल्वेस्थानकांवर गर्दी आहे. कोणाची कंपनी बंद तर कोणाला नोकरीवरून काढले आहे.

दिल्ली } बस, रेल्वे स्थानकांवर मजुरांचे लोंढे
दिल्लीत गेल्या अनेक दिवसांपासून मजूर गावी परतू लागले आहेत. बसस्थानक असो की रेल्वेस्थानकावर मजुरांची मोठी संख्या दिसते. लोक मूळ गावी परतू लागलेत. दिल्ली एनसीआरच्या अनेक भागात मजुरांना पलायन करण्याशिवाय गत्यंतर नाही. गुरुग्राममध्येही बसस्थानकावर मजूर मोठ्या संख्येने दिसत आहेत.

मुंबई }गेल्यावेळसारख्या लॉकडाऊनची धास्ती
रेल्वे आणि बसस्थानकांवर मजुरांची गर्दी होतेय. लोकांना या वेळचा लॉकडाऊनही मागील अनुभव देणारा ठरेल, अशी भीती वाटते. म्हणूनच मजुरांना वेळेतच गावी पोहोचायचे आहे. ठाणे, नवी मुंबई, पालघर जिल्ह्यातील भोईसर येथून मजुरांनी पलायन केले. पुण्यातील चाकण आैद्योगिक क्षेत्रातूनही स्थलांतर वाढले.

हतबल मजूर काय म्हणतात....

  • आधी राइस मिलमध्ये काम करत होतो. एक वर्षापासून राहतोय. पैसे कुटुंबाला पाठवत होताे. परंतु आता मिल बंद झाली. येथे राहून काय करणार? परत गावी जातोय. -नितीश , मजूर, बिहार
  • नागपूरच्या कंपनीत काम करत होतो. मालकाने कंपनीला टाळे लावले. त्यामुळे राहणे व खाण्यासाठी पैसा नाही. येथे राहून काय करणार? घरी जातोय.
  • -मुरारी कुमार, मजूर , बिहार
  • लोखंडाच्या कारखान्यात काम करून उदरनिर्वाह चालवत होतो. लॉकडाऊन लागू होऊ शकतो. म्हणूनच गावी परतण्यातच भलाई आहे. -पंकज वैष्णव, मजूर, छत्तीसगड
  • कंपनी बंद झाली. मुंगेली गावाला परततोय- हेमलाल यादव, छत्तीसगड
  • खासगी कंपनीत विक्रीचे काम करत होताे. कंपनी बंद झाली. भोजन-निवासाची समस्या निर्माण झाली. म्हणून मूळ गावी परततोय. -निखिल गौतम, कर्मचारी, उत्तर प्रदेश
  • यूपीचा आहे. नागपूरमध्ये टेलरिंगचे काम करायचो. मोठ्या ऑर्डर मिळायच्या. ते बंद झाले. लॉकडाऊनमध्ये त्रास वाढेल. म्हणून घरी जातोय. -लाल मोहंमद, उत्तर प्रदेश
बातम्या आणखी आहेत...