आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची मुलगी आणि ठाकरे घराण्याची नववधू अंकिता पाटील यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. याची माहिती त्यांनी स्वत: ट्विटरवरून दिली आहे. अंकिता पाटील आणि निहार ठाकरे यांचे लग्न गेल्याच आठवड्यात पार पडले आहे.
अंकिता पाटील यांच्यालग्नानंतर अनेक नेते कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आले होते. यामध्ये खासदार सुप्रिया सुळे, हर्षवर्धन पाटील यांचा समावेश आहे.
काय म्हणाल्या अंकिता पाटील?
आज माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे. माझी तब्येत व्यवस्थित आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने मी पुढील उपचार घेणार आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी व सर्वांनी आपली काळजी घ्यावी असेही आवाहन त्यांनी केले.
हर्षवर्धन पाटलांनाही कोरोना
गेल्या काही दिवसांपासून कोरोना वाढत आहे. आपल्या सर्वांच्या व सहकाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मी काल कोरोना तपासणी केली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. पुढील उपचारासाठी मी रूग्णालयात दाखल झालो आहे. इच्छा असताना देखील ही निर्बंधांमुळे व आपल्या सुरक्षेच्या कारणास्तव आपल्या सर्वांना भेटता येत नाही व आपले प्रश्न सोडवता येत नाहीत. परंतु प्रत्यक्ष मी जरी आपल्या सर्वांना भेटू शकत नसलो तरीही आपण मला दूरध्वनीद्वारे किंवा माझ्या कार्यालयास संपर्क करून आपल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी निसंकोचपणे सांगू शकता” असे ट्वीट हर्षवर्धन पाटील यांनी 31 डिसेंबरला केले होते.
गेल्या आठवड्यात विवाहबंधनात
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुतणे निहार बिंदूमाधव ठाकरे यांचा विवाह 28 डिसेंबर रोजी भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील यांचासोबत झाला. मोठ्या शाही थाटात मुंबईतील ताज हॉटेलमध्ये दोघं लग्नबंधनात अडकले.
शनिवारी पंकजा मुंडेंना कोरोना
राज्यातील 20 आमदार आणि 10 मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना काल कोरोनाची लागण झाली आहे. ट्विट करुन आपल्याला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.