आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जितेंद्र जोशीला कोरोनाची लागण:म्हणाला- कोरोनाने मला निवडले, पण नेमका कुठला कोरोना ते रिपोर्ट आल्यावर कळेल

11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जवळपास दोन वर्षांपासून राज्यात कोरोनाचे् संकट आहे. आतापर्यंत यामध्ये अनेक सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत आणि मोठ्या नेत्यांनी कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान, मराठी सिनेसृष्टीतही शिरकाव केला आहे. सुप्रसिद्ध मराठी अभिनेता जितेंद्र जोशीला कोरोना लागण झाल्याचे समोर आले आहे.

जितेंद्रने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. जितेंद्रला कोरोनाची सर्व लक्षणे जाणवल्याने त्याचे घरीत होम कोविड सेल्फ टेस्ट किटने कोरोना चाचणी केली असता त्याची चाचणी पॉझिटीव्ह आली.

जितेंद्रने सेल्फ टेस्ट किटमधील पॉझिटीव्ह आलेल्या रिपोर्टचा फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे. सेल्फ टेस्ट किटवरील चाचणी पॉझिटीव्ह आल्यानंतर जितेंद्रने लगचेच RTPCR टेस्ट केली असून त्याचे रिपोर्ट येणे अजून बाकी आहे, असेही सांगितले.

काय म्हणाला जितेंद्र?
कोरोनाने मला निवडले. अत्यंत त्रासदायक आणि "ताप"दायक अनुभव आहे. ताप तर आहेच शिवाय डोकेदुखी, अंगदुखी आणि सर्व लक्षणे!! माझ्या संपर्कात आलेल्यांनी चाचणी करून घ्यावी ही विनंती. माझा आरटीपीसीआर रिपोर्ट्स लवकरच मिळेल. वैद्यकीय उपचार सुरू आहेत. नेमका कुठला कोरोना आहे ते रिपोर्ट आल्यावर कळेल.

बातम्या आणखी आहेत...