आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोठा उपक्रम:महाराष्ट्रात सुरू झाली जगातील सर्वात मोठी प्लाझ्मा थेरपी ट्रायल, 500 लोकांवर प्लाझ्माचा उपचार सुरू

मुंबई10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाराष्ट्रातील लीलावती रुग्णालयात या थेरपीची यशस्वी चाचणी  झाली आहे. सरकारचे म्हणणे आहे की दर 10 पैकी 9 रुग्ण त्यातून बरे होत आहेत - Divya Marathi
महाराष्ट्रातील लीलावती रुग्णालयात या थेरपीची यशस्वी चाचणी झाली आहे. सरकारचे म्हणणे आहे की दर 10 पैकी 9 रुग्ण त्यातून बरे होत आहेत
  • या उपक्रमासाठी राज्य सरकारने 75 कोटींचे अतिरिक्त बजट केले निश्चित

दीड लाखांहून अधिक संक्रमित रूग्ण असलेल्या महाराष्ट्रात आज जगातील सर्वात मोठी प्लाझ्मा थेरपी चाचणी सुरू झाली. राज्य सरकारने याला 'प्रोजेक्ट प्लेटिना'चे नाव दिले आहे. आज एकाचवेळी 500 रुग्णांना प्लाझ्मा थेरेपीचे दोन डोस देण्यात आले. या रुग्णांवर आढळून आलेल्या परिणामानंतर संपूर्ण राज्यात गंभीर रुग्णांवर ही थेरपी केली जाणार आहे. यासाठी राज्य सरकारने 75 कोटींचे अतिरिक्त बजेट निश्चित केले आहे. या थेरपीचा संपूर्ण खर्च सरकार उचलणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धवट ठाकरे यांनी सांगितले आहे. 

कोरोनामुळे होणारा मृत्यू दर कमी करणे हा याचा उद्देश आहे. चाचणी आधारावर सरकारने दावा केला आहे की दहा पैकी नऊ रुग्ण प्लाझ्मा थेरपीमधून बरे होत आहेत. सरकारचा असा दावा आहे की मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमधील पहिले प्लाझ्मा थेरपी यशस्वी झाली. त्यानंतर मुंबईतच बीवायएल नायर हॉस्पिटलमध्ये दुसर्‍या रूग्णवर आणखी एक प्रयोग करण्यात आला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्वीट करुन या प्रकल्पाच्या सुरूवाती संदर्भातील माहिती दिली 

मुख्यमंत्र्यांनी केले प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन 

याआधी रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशातील सर्वात मोठी प्लाझ्मा थेरपी ट्रायलची माहिती देत लोकांनी प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन केले. त्यांच्या आवाहनामनंतर पोलिस विभागातील बरे झालेल्या सुमारे शेकडो लोकांनी प्लाझ्मा दान केला आहे.

आतापर्यंत 7,429 लोकांचा मृत्यू झाला आहे़

राज्यात रविवारी एका दिवसात विक्रमी 5,493 नवे रुग्ण आढळले. यासोबत कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 लाख 64 हजार 626 वर पोहचला आहे. तर आतापर्यंत एकूण 7, 429 लोकांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील विविध रुग्णालयांत 70 हजार 607 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या रुग्णांमधील गंभीर रुग्णांनाही ही थेरेपी देण्यात येणार आहे. 

अशाप्रकारे काम करते ही थेरेपी 

नुकत्याच आजारातून बरे झालेल्या रुग्णांच्या शरीरात रोगप्रतिकारक शक्तीमुळे प्रतिपिंडे तयार होतात जे आयुष्यभर राहतात. हे एंटीबॉडी रक्त प्लाझ्मामध्ये असतात. ते औषधात रूपांतरित करण्यासाठी, प्लाझ्मा रक्तापासून वेगळे होते आणि त्यानंतर त्यातून प्रतिपिंडे काढले जातात. ही अँटीबॉडीज नवीन रूग्णाच्या शरीरात सोडली जातात. यालाच प्लाझ्मा डेराइव्ड थेरेपी म्हणतात. हे अँटीबॉडीज रुग्णाच्या शरीरात तोपर्यंत रोगाशी क्षमता वाढवते जोपर्यंत त्याचे स्वतःचे शरीर हे स्वतः तयार करत नाहीत. 

अँटीबॉडीज म्हणजे काय?

बी-लिम्फोसाइट नावाच्या प्रोटीनपासून बनवलेल्या या विशिष्ट प्रकारच्या रोगप्रतिकारक शक्ती आहेत. जेव्हा कोणतीही बाह्य वस्तू (फॉरेन बॉडीज) शरीरात पोहोचतात तेव्हा या अँटीबॉडीज सतर्क होतात. बॅक्टेरिया किंवा व्हायरस द्वारा सोडण्यात आलेल्या विषारी पदार्थांना निष्क्रिय करण्याचे काम या अँटीबॉडीज करतात. अशाप्रकारच्या रोगाणूंच्या परिणामाला निष्क्रिय करतात. जशाप्रकारे कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये विशेष प्रकारची अँटीबॉडीज तयार झाली आहे. जेव्हा या रक्तातून काढून दुसऱ्या संक्रमित रुग्णांमध्ये सोडल्यास तो देखील कोरोनावर मात करू शकतो. 

बातम्या आणखी आहेत...