आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Corona Update Maharashtra | Mumbai Corona Update | In The Last 24 Hours In The State, 1,080 Coronaviruses Have Been Added, While More Than Twice As Many Patients Have Been Corona free

कोरोना अपडेट:राज्यात गेल्या 24 तासात 1 हजार 80 कोरोनाबाधितांची भर, तर दुपटीहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात कोरोनाची तिसरी लाट ओसरली आहे. कोरोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून आटोक्यात येताना पाहायला मिळत आहे. मात्र, सोमवारी हजारांखाली गेलेली रुग्णसंख्या आज काही प्रमाणात वाढली आहे. राज्यात गेल्या 24 तासात 1080 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 47 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक म्हणजे 2 हजार 488 रुग्ण आज कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. ओमायक्रॉनबाधितांचा विचार केला असता राज्यात आतापर्यंत 4509 ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले होते. त्यापैकी 3994 रुग्णांनी ओमायक्रॉनवर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

राज्यात आज 47 कोरोनाबाधितांचा मृत्यू

सोमवारच्या तुलनेत राज्यात आज मृत्यूचा प्रमाण वाढला आहे. सोमवारी राज्यात 4 जणांचा कोरोना उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. मात्र, आज 47 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. राज्याचा सध्याचा मृत्यूदर हा 1.82 टक्के इतका आहे. राज्यात आतापर्यंत 76 लाख 99 हजार 623 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.96 टक्के आहे. सध्या राज्यात 1 लाख 76 हजार 560 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 958 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 7 कोटी 73 लाख 83 हजार 579 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.

मुंबईतील 135 रुग्णांची नोंद
गेल्या 24 तासता मुंबई 135 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. सोमवारी मुंबईदेखील शंभरहून कमी रुग्णांची नोंद झाली होती. मात्र आज सोमवारच्या तुलनेत 39 रुग्ण अधिकचे आढळले आहेत. सोमवारी 96 रुग्ण आढळले होते. मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत आज 135 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 233 जण कोरोनामुक्त झाले आहे.

नव्याने आढळलेल्या कोरोना रुग्णांमुळे मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या 1 हजार 315 इतकी झाली आहे. आज नव्याने सापडलेल्या 135 रुग्णांपैकी 20 रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने पालिकेकडील 36 हजार 248 बेड्सपैकी केवळ 781 बेड वापरात आहेत. याशिवाय मुंबईतील साप्ताहिक कोरोना रुग्णवाढीचा दर ही 0.02% टक्के इतका झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...