आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोठा दिलासा:राज्यात आज दोन हजारांहून कमी कोरोना रुग्ण; तर गेल्या 24 तासात 11 हजार जणांनी केली कोरोनावर मात

मुुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा घसरता आलेख पाहायला मिळत आहे. ही एक दिलासायक बाब म्हणावी लागेल. आज दोन हजारांहून कमी कोरोना रुग्ण आढळले आहेत. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात सोमवारी 1 हजार 966 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 12 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर दिलासायक म्हणजे गेल्या 24 तासात 11 हजार 408 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

राज्यात सध्या 36 हजार 447 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत 76 लाख 61 हजार 77 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचा प्रमाण हा 97.66 टक्के इतका आहे. आज राज्यात 12 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर हा 1.82% टक्के इतका आहे. दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या ओमायक्रॉन या विषाणूनचे आज 8 रुग्ण आढळले आहेत.

मुंबईतील रुग्णसंख्येत घट?

मागील काही दिवसांपासून मुंबईतील रुग्णसंख्येत होणारी घट आजही कायम राहिली आहे. मुंबईत सोमवारी 192 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी मुंबईत 192 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 350 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे मुंबईतील रिकव्हरी रेट 98 टक्के इतका झाला आहे. नव्याने आढळलेल्या कोरोना रुग्णांमुळे मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या 2 हजार 513 इतकी झाली आहे. तर कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी 1691 दिवसांवर आला आहे. रविवारच्या तुलनेत यामध्ये तब्बल 294 दिवसांची वाढ झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...