आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात कोरोनाबाबत दिलासा:आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले - चौथ्या लाटेची शक्यता कमी, रुग्णवाढीचा वेगही अत्यंत कमी

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात कोरोना रुग्णवाढीचा वेग कमी असून, त्यामुळे चौथ्या लाटेची शक्यता कमी असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले. ते आज मुंबई पत्रकारांशी बोलत होते. राज्यात कोरोना रुग्ण सक्रिय होण्याची गती ही अतिशय कमी असून, काही भागात रुग्णसंख्यात वाढ आहे. त्यात मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे अशा दोन-चार जिल्ह्यांमध्ये काही प्रमाणात रुग्ण सापडत आहे, परंतु याचा अर्थ असा नाही की, कोरोनाची चौथी लाट येणार आहे असा कुठलाही विषय नाही, असे राजेश टोपे म्हणाले.

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची एक मिटींग झाली असून, त्यात देशातील सर्व राज्यातील आरोग्यमंत्र्याचा सहभाग होता. त्या मिटींगमध्ये आम्ही सर्वांनी वेगवेगळ्या मुद्यावर चर्चा केली. मी पंजाब आणि दिल्लीच्या आरोग्यमंत्र्याला वाढत्या रुग्णसंख्येविषयी विचारले असता ते म्हणाले की, कोरोना रुग्ण अतिशय कमी प्रमाणात वाढत आहे, मात्र हा आजाराचे लक्षणं सौम्य स्वरुपाचे आहेत. त्यामुळे कोणीही रुग्णालयात जात नाही, घरी राहूनच यावर उपचार केले जात आहे, अशी माहिती टोपे यांनी दिली.

कोरोना रुग्ण वाढ आहेत, मात्र काळजी करण्यासारखे कोणतेही कारण नाही, आपण दररोज कोरोना रुग्णसंख्येवर लक्षं देऊन आहोत. जर भविष्यात रुग्णसंख्येत वाढ झाली तर केंद्राने दिलेल्या सूचनाने आपण पालन करू, असेही टोपे म्हणाले.

फोटो काढून त्याला व्हायरल करणे योग्य नाही

पुढे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नवनीत राणा यांच्या लीलीवती रुग्णालयात MRI दरम्यान झालेल्या फोटोग्राफी प्रकरणावर भाष्य केले. ते म्हणाले की, कुठल्याही परिस्थितीत फोटोज काढणे हा नियमाचा भाग नाहीच आहे. त्यामुळे फोटो काढून त्याला व्हायरल करणे किंवा त्याबाबत चर्चा करणे त्याला पॉलिटीसाईझ करणे हे योग्य नाही, इतकेच माझे म्हणणे आहे, असे राजेश टोपे म्हणाले.

या प्रकरणाची चौकशी होणार

फोटो रुग्णालय प्रशासनाने काढले की इतर कोणी काढले याची सखोल चौकशी केली जाईल. कायद्याच्या अनुषंगाने तपासून योग्य ती कारवाई केली जाईल, मी स्वत: लीलावतीच्य़ा प्रशासनाला बोलणार आहे, असे टोपे म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...