आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काँग्रेसची विनंती:मुंबईसाठी मोदी आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र यावे, काँग्रेस नेत्याची विनंती, एकट्या मुंबईत देशातील 10 टक्के रुग्ण

मुंबई25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशाच्या एकूण सकल राष्ट्रीय उत्पादनात (जीडीपी) मुंबईचा वाटा 6 टक्के इतका आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव देशभरात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. देशभरातील सर्वाधिक रुग्ण हे राज्यात आहे. दरम्यान मुंबईतही रुग्ण संख्या सातत्याने वाढत आहे. कोरोनापासून मुंबईला वाचवण्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेने एकत्र यायला हवे अशी विनंती काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी व्यक्त केली आहे.

सध्या देशभरामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण सापडत आहेत. दरम्यान देशात नवीन सापडणाऱ्या कोरोना रुग्णांपैकी 10 टक्के रुग्ण हे एकट्या मुंबईतील आहेत. देशाच्या एकूण सकल राष्ट्रीय उत्पादनात (जीडीपी) मुंबईचा वाटा 6 टक्के इतका आहे. त्यामुळे मुंबईला कोरोनाच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज असल्याचे काँग्रेस नेता मिलिंद देवरा म्हणाले आहेत.

महाराष्ट्रात रविवारी 40,414 नवीन रुग्ण आढळले. 17,874 बरे झाले तर 108 जणांचा मृत्यू झाला. हा एका दिवसात आढळलेल्या संक्रमितांचा सर्वात मोठा आकडा आहे. यापैकी 6 हजार 923 म्हणजेच जवळपास सात हजार रुग्ण मुंबईत आढळून आले आहेत. राज्यात आतापर्यंत 27.13 लाख लोक या महामारीच्या विळख्यात सापडले आहेत.

बातम्या आणखी आहेत...