आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसचा मोदींवर निशाणा:'आमच्या नेत्याने पहिलेच रस्ता दाखवला होता, अहंकाऱ्यांनो जरा शिका'; नितीन राऊतांचा कार्टूनद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल

मुंबई12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आमचे नेते राहुल गांधींनी सुरुवातीलाच रस्ता दाखवला होता - नितीन राऊत

देशभरातील कोरोनाची दुसरी लाट आता ओसरताना दिसत आहे. दरम्यान देशातील लसीकरण मोहिम आता वेगाने सुरू केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील लसीकरण मोहीम पूर्णपणे केंद्र सरकार हाती घेणार असल्याची नुकतीच घोषणा केली. 21 जूनपासून देशभरात 18 वर्षांवरील नागरिकांना कोरोनाची लस मोफत देण्यात येणार आहे. आता यावरुनच काँग्रेस नेते आणि ऊर्जामंत्री नितीन राऊतांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली आहे.

नितीन राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना खोचक टोला लगावत ट्विट केले आहे. नितीन राऊतांनी एक कार्टुन ट्विट केले आहे. या माध्यमातून त्यांनी थेट पंतप्रधानांवर निशाणा साधला. यामध्येय ते म्हणाले की, 'आमचे नेते राहुल गांधींनी सुरुवातीलाच रस्ता दाखवला होता. राहुल गांधी कोरोनाच्या सुरुवातीपासूनच सरकारला खबरदार करायचे. यासोबतच योग्य तो सल्लाही ते देत होते. अहंकाऱ्यांनो, जरा शिका' असे ट्विट नितीन राऊतांनी केले.

नितीन राऊतांनी या ट्विटमध्ये एक कार्टुन शेअर केले आहे. या कार्टुनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात काठी आहे. तर राहुल गांधींनी मोदींना ही काठी समोरून पकडून मार्ग दाखवताना दिसत आहेत. या फोटोत वरच्या कोपऱ्यात राहुल गांधी यांनी केलेल्या ट्वीटचा एक स्क्रिन शॉटही दिसतोय. त्यात लसीची खरेदी केंद्र सरकारने करावी आणि वितर राज्य सरकारांनी. जेणेकरुन गावापर्यंत लस पोहोचेल, असे राहुल गांधींनी आधीच सुचवले असल्याचे सांगण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...