आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना लस:मोदी म्हणाले राज्य व केंद्र लसीची किंमत ठरवेल, नवाब मलिक म्हणतात - बिहारला लस मोफत देण्याचे आश्वासन दिले तर प्रत्येक भारतीयाला लस मोफत द्या

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकतीच सर्वपक्षीय बैठक घेतली होती.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वपक्षीय बैठक घेतली. या बैठकीत मोदी म्हणाले होते की, कोरोना लसीसाठी जास्त काळ प्रतीक्षा करण्याची गरज भासणार नाही, ही लस काही आठवड्यांत तयार होईल. या लसीची किंमत राज्य आणि केंद्र मिळून ठरवले. मात्र आता यावर राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिकांनी प्रश्न उपस्थित केला आहे. प्रत्येक भारतीयांना लस मोफत द्या असे मलिक म्हणाले आहेत.

नवाब मलिक म्हणाले की, 'पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठक घेतली आणि आता ते म्हणत आहेत की राज्य व केंद्र किंमत ठरवेल, ते कसे असेल? बिहारमध्ये त्यांनी लसीकरण मोफत मिळेल असे आश्वासन दिले. आमची मागणी आहे की प्रत्येक भारतीयाला विनाशुल्क लस मिळायला हवी.'

पंतप्रधान मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फ्रेंसमध्ये म्हटले होते की, 'लसीच्या किंमतीचा प्रश्न देखील स्वाभाविक आहे. केंद्र या संदर्भात राज्यांशी बोलत आहे. सार्वजनिक आरोग्यास प्राधान्य देत निर्णय घेण्यात येईल. भारत आज त्या देशांपैकी एक आहे जिथे दररोज अधिक चाचण्या केल्या जात आहे. रिकव्हरीचे प्रमाण जास्त आणि मृत्यूचे प्रमाण कमी अशा देशांपैकी भारत एक आहे. कोरोनाविरुद्ध आम्ही ज्या प्रकारे लढा दिला त्यावरून प्रत्येक देशवासियाची इच्छा दर्शविली जाते. विकसित देशांच्या तुलनेत भारताने युद्ध चांगल्या पद्धतीने लढले आहे.'

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser