आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना व्हॅक्सीन:मुंबईतील केईएम रुग्णालयात कोरोना लस कोव्हिडशील्डचे मानवी परीक्षण सुरू, तीन स्वयंसेवकांना दिली जाणार लस

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पुण्यातील सीरम इंस्टिट्यूटने ब्रिटिश स्वीडिश फार्मा कंपनी Astra Zeneca सोबत कोव्हिड 19 लस तयार करण्यासाठी भागीदारी केली आहे.

कोरोना लसीची चाचणी आता मुंबईत सुरू झाली आहे. केईएम रुग्णालयात कोरोना लस कोव्हिडशील्डचे मानवी परीक्षण सुरू करण्यात आले आहे. कोव्हिशिल्ड लशीची ही तिसऱ्या टप्प्यातील चाचणी आहे. आज म्हणजेच शनिवारी तीन स्वयंसेवकांवर या कोरोना लसीची चाचणी घेतली जाणार आहे.

तर आरटीपीसीआर आणि अँटिबॉडीज चाचणी निगेटिव्ह आलेल्या तीन स्वयंसेवकांना आज लस टोचण्यात येईल. लस दिल्यानंतर तिघांवर काही परिणाम होतो का, याची तपासणी करण्यात येणार आहे. एक महिन्यांने पुन्हा लसीचा दुसरा डोस दिला जाणार असल्याची माहिती माहिती केईएम रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी दिली.

तसेच आतापर्यंत 13 लोकांवर स्क्रीनिंग करण्यात आली आहे. यामध्ये 10 लोकांची स्क्रीनिंग आतापर्यंत पूर्ण झालेली आहे. तसेच पुण्यातील सीरम इंस्टिट्यूटने ब्रिटिश स्वीडिश फार्मा कंपनी Astra Zeneca सोबत कोव्हिड 19 लस तयार करण्यासाठी भागीदारी केली आहे. ही लस ऑक्सफोर्ड यूनिव्हिर्सिटीमध्ये तयार करण्यात आली आहे.

मानवी परीक्षण प्रक्रियेमध्ये एका इतर व्यक्तीला प्लेसीबो मिळणार आहे. केईएम हे पहिले रुग्णालय आहे. जिथे सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाद्वारे निर्मित मानवी परीक्षण केले जाई. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीद्वारे कोव्हिडशील्ड लस विकसित करण्यात आली आहे आणि भारतातील पुण्यातील सीरम इंस्टिट्यूट तयार करत आहे.

दरम्यान देशभरातील कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. तसेच मुंबईतील कोरोना रुग्णही सातत्याने वाढत आहे. देशभरातील कोरोनाचा प्रभाव हा कमी होताना दिसत नाहीये. देशात आतापर्यंत 59 लाख 1 हजार 571 लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. यामध्ये 48 लाख 46 हजार 168 लोकांनी कोरोनावर मात कतेली आहे. तर 93 हजार 410 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...