आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना लस:मुंबई विमानतळावर कोरोना लस वाहतूक-व्यवस्थापनाची तयारी, 24 तासांत कस्टमर केअर सेवा सुरू होणार

नवी दिल्ली/मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चाचणीच्या निकालाच्या घोषणेसोबतच देशात कोरोना लस मिळवण्याच्या आणि ती इतर ठिकाणी पोहोचवण्याच्या तयारीला वेग आला आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे महाव्यवस्थापक जे. बी. सिंह यांनी सांगितले की, ‘आमचे सर्व विमानतळ पूर्णपणे तयार आहेत. सरकारकडून निर्देश मिळताच आम्ही लसीच्या पुरवठ्याचे काम सुरू करू.’

दिल्ली विमानतळाचे व्यवस्थापन पाहणाऱ्या ‘डायल’चे पीआरओ सर्वोत्तम यांनी सांगितले, ‘आम्ही पूर्णपणे तयार आहोत. आमच्याकडे १.५ लाख मेट्रिक टन कोल्ड चेन स्टोअरेजची क्षमता आहे. मुंबई तर याबाबत दोन पावले पुढेच आहे. तेथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (सीएसएमआयए) लसींची वाहतूक आणि व्यवस्थापन यासाठी लवकरच एक कृती दल म्हणजे टास्क फोर्स तयार करणार आहे. हे कृती दल विमानतळ आणि ग्राहक, नियामक आणि सरकारी संस्था यांच्यात सेतूचे काम करेल.’

लोकांना सोप्या भाषेत लसीची माहिती द्या : पंतप्रधानांचे ३ कंपन्यांना आवाहन :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी लस विकसित आणि उत्पादन करत असलेल्या तीन चमूंसोबत आॅनलाइन बैठक घेतली. या बैठकीत जेनोव्हा बायोफार्मा, बायोलाॅजिकल ई आणि डाॅ. रेड्डीचे प्रतिनिधी सहभागी झाले. लोकांना लसीच्या परिणामासह तिच्याशी संबंधित इतर बाबी सोप्या भाषेत समजावून सांगण्यासाठी अतिरिक्त प्रयत्न करावेत, असा सल्ला पंतप्रधानांनी या कंपन्यांना दिला. मोदींनी लसीच्या मंजुरीशी संबंधित प्रक्रिया आणि इतर मुद्द्यांबाबत सल्ला मागितला. तसेच संबंधित विभागांना लस कंपन्यांसोबतच्या अडचणी सोडवण्याचे निर्देश दिले. त्यांनी लसीच्या पुरवठ्यासाठी लाॅजिस्टिक, वाहतूक आणि कोल्ड चेनच्या मुद्द्यांवरही चर्चा केली. शनिवारीच पंतप्रधानांनी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट, अहमदाबाद येथील झायडस बायोटेक पार्क आणि हैदराबाद येथील भारत बायोटेक फॅसिलिटीचा दौरा करून लसीची माहिती घेतली होती.

मुंबईची तयारी : 24 तासांत कस्टमर केअर सेवा सुरू होणार :
- एका इंग्रजी वृत्तपत्रानुसार हे कृती दल कडक सुरक्षा व्यवस्थेसह कमी तापमानाच्या साठ्याचेही व्यवस्थापन करेल.
- नियामकीय संस्थांकडून आवश्यक मंजुरी घेऊन लसीच्या वाहतुकीसाठी लागणारा वेळ कमी करण्यासाठी काम करेल. उत्पादन स्थळापासून लोकांना लस देण्यापर्यंतच्या रस्त्यात लस घेऊन जाण्यासाठी कोल्ड चेनची व्यवस्थाही पाहील.
- मुंबई विमानतळावर आठवड्यातील सातही दिवस २४ तास चालणारे कस्टमर केअर सर्व्हिस सेंटरही तयार केले जाईल. या केंद्रातून भारतातून आयात-निर्यात होणाऱ्या लसीशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser