आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाराष्ट्रात मोफत लसीकरणावर संभ्रम:आधी ठाकरे सरकारच्या मंत्र्यांनी म्हटले सर्वांना मोफत देणार लस, आता उपमुख्यमंत्री म्हणतात- 'उद्याच्या कॅबिनेट बैठकीमध्ये मुख्यमंत्रीच अंतिम निर्णय घेतील!'

मुंबई10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आर्थिक भाराविषयीचा कोणताही निर्णय मुख्यमंत्रीच घेत असतात.

राज्यातील कोरोना परिस्थिती ही दिवसेंदिवस गंभीर होत असताना दिसत आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरण मोहिमेवर लक्ष केंद्रीत केले जात आहे. 1 मेपासून 18 वर्षांवरील नागरिकांना लस दिली जाणार आहे. दरम्यान राज्यात 18 वर्षांवरील नागरिकांचे मोफत लसीकरण केले जाणार का? हा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिकांनी हा निर्णय झाला असल्याचे म्हटले होते. मात्र अद्याप यावर मुख्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरण आलेले नाही. आता यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाष्य केले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार याविषयी बोलताना म्हणाले की, 'उद्या कॅबिनेटमध्ये याविषयावर चर्चा केली जाणार आहे. त्यावर बैठकीमध्ये चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील. संपूर्ण देशातच लसींची कमतरता जाणवत आहे. केंद्र सरकारचे लस उत्पादनावर, ऑक्सिजन प्लांटवर, रेमडेसिविर इंजेक्शन कंपन्यांवरही नियंत्रण आहे. खरेतर देशातील सर्व जनतेचे लसीकरण करण्याचे काम हे भारत सरकारचे आहे. सरकार केवळ 45 पेक्षा वयाच्या सर्व लोकांना मोफत लसीकरण करत आहे. मात्र 44 वयोगटाच्या लोकांसाठी काय? असा प्रश्न आम्ही विचारतोय. पण उद्या तशी वेळ पडली तरीही राज्य सरकार हे कमी पडणार नाही. असेही अजित पवार म्हणाले आहेत.

तसेच पुढे बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, आर्थिक भाराविषयीचा कोणताही निर्णय मुख्यमंत्रीच घेत असतात. मोफत लसीकरणाच्या प्रस्तावावर सही करण्यात आली आहे. यामुळे उद्या सर्वानुमते याविषयावर योग्य तो निर्णय घेण्यात येईल.

काय म्हणाले होते नवाब मलिक?
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना ही महत्त्वाची घोषणा केली होती की, 'महाराष्ट्र सरकारच्या वतीने राज्यातील 18 ते 45 वयोगटातील प्रत्येकाला मोफत लस दिली जाणार आहे. सरकार आपल्या तिजोरीमधून हा कार्यक्रम हातात घेणार आहे. जागतिक टेंडर मागवण्यात येईल आणि जास्तीत जास्त लस खरेदी केल्या जातील. कॅबिनेट बैठकीमध्ये याविषयी चर्चा झाली आणि एकमत झाल्यानंतर राज्यातील जनतेला मोफत लस देण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याला होकार दिला आहे. मोफत लसीकरणासाठी लवकरात लवकर टेंडर काढण्यात येणार आहे' असेही नवाब मलिक म्हणाले होते.

बातम्या आणखी आहेत...