आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाराष्ट्र कोरोना:राज्यात रुग्णसंख्या 20 हजारांवर, आज पुण्यात 102 नवीन रुग्णांची नोंद, तर 5 जणांचा मृत्यू

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • महाराष्ट्रात ६ दिवसांत सर्वाधिक वाढले रुग्ण

महाराष्ट्रात २४ तासांत ११६५ नव्या रुग्णांसह बाधितांची संख्या २० हजारांवर पोहोचली. राज्यात एकूण २०,२२८ रुग्ण आढळले आहेत. ही संख्या देशाच्या एक तृतीयांश आहे. राज्यात ४८ नव्या मृत्यूंसह एकूण ७७९ मृत्यू झालेत. मुंबईत ७७२ नवे रुग्ण आढळले. आता एकूण रुग्णसंख्या १२,८६४ झाली असून ४८९ जणांचा मृत्यू झाला आहे.

786 पोलिसांना कोरोनाची लागण 

राज्यातील 786 पोलिस कर्मचाऱ्यांच्या कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. यामध्ये 709 अॅक्टीव्ह रुग्ण आहे तर 76 जण बरे झाले आहेत. राज्यात कोरोनामुळे 7 पोलिस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. लॉकडाऊन दरम्यान पोलिसांवर हल्ल्याच्या 200 घटना घडल्या आहेत. याप्रकरणी 732 आरोपींना अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलिसांनी ही माहिती दिली आहे. 

नागपुरात रुग्णांचा आकडा २८१ वर; सातारा जिल्ह्यात ११६ रुग्ण

उपराजधानी नागपुरात शनिवारी आणखी १० रुग्ण वाढल्याने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा २८१ वर पोहोचला आहे. नव्या वस्त्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून येत असल्याने प्रशासनाच्या चिंता वाढल्या आहेत. शनिवारी आणखी दहा अहवाल पॉझिटिव्ह आले. अलीकडेच कोरोना संसर्गापायी मृत्यूचे प्रकरण उघडकीस आलेल्या पार्वतीनगर परिसरातून शंभरावर रहिवाशांची विलगीकरण कक्षात रवानगी करण्यात आली आहे. शनिवारी या परिसरातील एक व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे सांगण्यात आले.

नाशकात कोरोनाने पोलिसाचा मृत्यू; जिल्ह्यातील २० वा बळी

पाचशेपेक्षा अधिक रुग्ण असलेल्या मालेगावमध्ये कर्तव्य बजावताना आठवडाभरापूर्वी लागण झालेल्या ५१ वर्षीय पोलिस कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला. जिल्ह्यातील कोरोनाचा हा २०वा बळी असून जिल्यात प्रथमच एका पोलिसाचा केरोणामुळे मृत्यू झाला. नाशिक जिल्ह्यातील कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या मालेगावात कर्तव्य बजावत असलेल्या अनेक पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. याच पोलिसांच्या संपर्कात नाशिकमधील आडगाव परिसरातील धात्रकफाटा येथील रहिवासी होते.

यापूर्वीही एक मृत्यू

जिल्ह्यातील कोरोनाचा हा २०वा बळी आहे. यापूर्वी मालेगावातील १८ तर नाशिक शहरातील एका गर्भवती महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. संबंधित पोलिस कर्मचारी नाशिक शहरांमधील रहिवासी शहरातील आज दुसऱ्या केरोना बधितच्या मृत्यू झाला आहे.

साताऱ्यात ११६ रुग्ण

पारले कोविड केअर सेंटर कराड येथे दाखल असणाऱ्या एका निकट सहवासिताचा अहवाल कोरोनाबाधित आला असून जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्या व्यक्तींची संख्या ११६ झाली आहे. यापैकी उपचार घेत असलेले बाधीत रुग्ण ९४, कोरोना मुक्त होऊन घरी गेले रुग्ण- २०, तर दोघांचा मृत्यू झाला.

पुण्यात १४८ नवीन कोरोना रुग्ण, ४ मृत्यू

कोरोना प्रादुर्भावाने सलग तिसऱ्या दिवशी शंभरीचा आकडा पार केला असून, गेल्या २४ तासात तब्बल १४८ कोरोना बाधित सापडले आहेत. तर चार जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुणे शहरातील मृतांची एकूण संख्या १४० इतकी झाली असून, आतापर्यंत २ हजार ३८० जणांना लागण झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

९५ रुग्ण बरे होऊन घरी गेले : सुखद बाब म्हणजे शनिवारी या आजारातून तब्बल ९५ जण बरे होऊन घरी गेले. पुणे शहरासह जिल्ह्यात बाधितांचा आकडा पुन्हा झपाट्याने वाढू लागला आहे. त्यामुळे प्रशासन आणि आरोग्य विभागात खळबळ उडली असून, या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले जात आहे. सध्या १ हजार ४१४ करोना बाधितांवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...