आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाराष्ट्र कोरोना:कोरोनाग्रस्तांचा आकडा 50 हजारांच्या पुढे; आज तब्बल 3,041 नवीन रुग्णांची नोंद

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्यात शनिवारी 2608 नव्या रुग्णांसह एकूण संख्या 47190 वर पोहोचली

महाराष्ट्रातील संक्रमितांचा आकडा 50 हजारांच्या पुढे गेला आहे. रविवारी(दि.24) राज्यात 3,041 नवीन रुग्ण मिळाल्या नंतर राज्यातील एकूण रुग्णांचा आकडा 50,231 झाला आहे. तसेच, आज 58 कोरोना संक्रमितांचा मृत्यूही झाला आहे. आता राज्यातील मृतांचा आकाड 1,635 झाला आहे. रविवारी मृत्यू झालेल्या कोरोना संक्रमितांमध्ये 39 मुंबई, 6 पुणे, सोलापूर 6, औरंगाबादसे 4, लातूर 1, मीरा-भायंदर 1 आणि ठाण्यातील 1 रुग्णांचा समावेश आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी रविवारी सांगितले की, लॉकडाउन 31 मे नंतर उठवले जाईल, याबाबत काही सांगता येत नाही. आपल्याला यासोबतच पुढे जावे लागेल. येणारे 15 दिवस महत्वाचे आहेत. अनेक ठिकाणी सूट दिल्यामुळे संक्रमण वाढण्याची शक्यता आहे. मी आरोग्य कर्मचाऱ्यांना सांगू इच्छितो की, सरकार त्यांच्यासोबत आहे. सुरुवातीला सांगण्यात येत होते की, महाराष्ट्रातील संक्रमितांचा आकडा दिड लाखांच्या पार होईल, पण आम्ही याला खूप कंट्रोल केला आहे. सर्वजण कोरोनाशी सामना करत आहेत. येणाऱ्या काळात कोरोनाचे रुग्ण वाढतील, पण घाबरण्याची गरज नाही. > 3 लाख 48,026 आजवर चाचण्या

> 2 लाख 98,696 संशयित निगेटिव्ह

> 4 लाख 85,623 नागरिक होम क्वाॅरंटाइनमध्ये

> 33 हजार 545 नागरिक संस्थात्मक क्वाॅरंटाइनमध्ये

नाशिक जिल्ह्यात १८ नवे रुग्ण, एकूण ९२० बाधित

कोरोना विषाणूने आता नाशिक शहरासह ग्रामीण भागालाही आपल्या कवेत घेण्यास सुरुवात केली आहे. शनिवारी टाकळी येथील एकाचा मृत्यू झाल्याने कोरोनाने शहरात ४ आणि जिल्ह्यात ४८ बळी घेतले आहे. तर नवीन आढळलेल्या आठ बाधितांसह गत तीन दिवसांत शहरात नवे ३० कोरोना रुग्ण आढळून आले आहे. तर ग्रामीणमध्ये निफाडमधील ३, सिन्नर, ३ मनमाड, २ आणि चांदवड येवल्यातील प्रत्येकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील बाधितांचा आकडा ९२० तर शहरातील बाधितांचा ७५ इतका झाला आहे. यातील ४७ जणांचा मृत्यू झाला आहे.

मालेगावमधील बाधितांचे अहवाल येणे कमी कमी होत असताना नाशिक शहरात हळूवारपणे त्यात वाढ होत आहे. शनिवारी उच्चभ्रूंची वसती समजल्या जाणाऱ्या कॉलेज रोड येथील एक आणि सिडको मधील राणाप्रताप चौक येथील संशयिताचा अहवाल कोरोना पॉझीटीव्ह आला अन् सायंकाळी पुन्हा ६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यातील जुने नाशिक नाईकवाडी पुरा येथील ४, आगार टाकळीतील समता नगरमधील एक आणि पाथर्डी फाटा येतील एकाचा समावेश आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकाच दिवशी आढळले ८ पॉझिटिव्ह रुग्ण: सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकाच वेळी ८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णाची संख्या १६ वर पोहचली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी शनिवारी यांनी दिली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात शनिवारी एकाच दिवसात ८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली. यामध्ये कणकवली तालुक्यातील डांबरे गावात ४ रुग्ण, ढालकाठी येथील २, मालवण तालुक्यातील हिवाळेच्या १ वैभववाडी -नाधवडे येथील १ रुग्ण आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात यापूर्वी ८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेले, त्यातील ५ रुग्ण बरे होऊन कोरोना मुक्त झाले असून ३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये नवे २४९ रुग्ण, सात मृत्यू

मागील दोन दिवसांपासून कोरोना बाधितांची वाढलेली संख्या शनिवारी काहीशी कमी झाली. शनिवारी पुण्यात २०५ आणि पिंपरी चिंचवडमध्ये ४६ असे एकूण २४९ नवीन बाधित व्यक्ती सापडले आहेत. त्यामुळे पुणे शहरातील एकूण बाधितांची संख्या ४ हजार ६०३ एवढी तर पिंपरी चिंचवड मध्ये ३११ झाली आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

शनिवारी १ हजार ७१३ जणांचे नमुने तपासण्यात आले. त्यामध्ये २०५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यातील १६५ नायडू रुग्णालयातील असून ७ ससून तर खासगी रुग्णालयातील ३३ जणांचा समावेश आहे.

२४ तासात सात जणांचा करोनामुळे मृत्यू : गेल्या २४ तासात ससून रुग्णालयासह नायडू, पुना आणि रूबी हॉस्पिटलमध्ये एकूण ७ जणांचा मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामध्ये ससून रुग्णालयात ४ तर पुना हॉस्पीटल, नायडू आणि रूबी हॉस्पिटलमध्ये प्रत्येकी एकाचा समावेश आहे. हे सर्व मृत व्यक्ती वयवर्षे ५१ ते ६७ या वयोगटातील असून, येरवडा, सदाशिव पेठ, शुक्रवार पेठ, हडपसर, कोरेगाव पार्क आणि गंजपेठेतील रहिवाशी आहेत. या सर्व व्यक्तींचे जुन्या आजाराची हिस्ट्री असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...