आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लॉकडाऊनविषयी राजेश टोपे म्हणाले..:'वाढती रुग्णसंख्या सरकारसाठी चिंतेचा विषय, हे रोखण्यासाठी जे गरजेचे आहेत ते सरकारकडून केले जातेय'

मुंबई23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लॉकडाऊनचा निर्णय अचानक घेतला जात नसतो

राज्यातील कोरोना परिस्थिती ही दिवसेंदिवस गंभीर होताना दिसत आहे. दरम्यान कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी लॉकडाऊन लावण्यात येणार अशा चर्चा सुरू आहेत. मात्र राज्य सरकारच्या या भूमिकेवर नागरिकांपासून ते विरेधीपक्षही मोठ्या प्रमाणात टीका करत आहेत. आता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याविषयावर भाष्य केले आहे.

माध्यमांशी संवाद साधत असताना राजेश टोपे म्हणाले की, 'लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय आहे. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्य सरकारला याविषयी चिंता आहे. ही रुग्णसंख्या रोखण्यासाठी जे करणे आवश्यक आणि गरजेचे आहे, ते सरकारकडून केले जात आहे. संसाधनांची कमतरता पडू दिली जाणार नाही. कोरोना संख्येच्या वाढत्या गतीपुढे आपली संसाधने कमी पडू शकतात अशी मला शंका वाटते आहे. लॉकडाऊन लावण्याची हौस कुणालाही नाही. पण परिस्थिती येते तेव्हा ऐनवेळी लॉकडाऊन करत नसतो. तो अभ्यास करण्याचा विषय असतो. पण आपली संसाधने जर वाढत्या रुग्णांच्या पुढे कमी पडत असतील तर लॉकडाऊन करावा लागतो,' असे टोपे म्हणाले आहेत.

लॉकडाऊनचा निर्णय अचानक घेतला जात नसतो
पुढे बोलताना टोपे म्हणाले की, 'लॉकडाऊन हा शेवटी विचार करुन निर्णय घेण्याचा विषय आहे. म्हणजेच जर निर्बंध कडक करायचे असतील तर कसे करावे, उद्योगांना हात लावू नये, स्थलांतरित मजुरांचा मुद्दा उपस्थित झालेल्या क्षेत्राला हात लावू नये अशा अनेक गोष्टींचा अभ्यास केला जातो. त्या अभ्यासाच्या माध्यमातून, परिस्थितीवर नजर ठेवून नंतर निर्णय घेण्यात येतो. त्यामुळे तात्काळ लॉकडाऊनचा निर्णय घेतला जात नसतो.' असे राजेश टोपे म्हणाले.

लोकांचा निर्धास्तपणा मुख्य कारण
आरोग्य मंत्र्यांनी राज्यातील रुग्णसंख्या का वाढत आहे याचे कारणही सांगितले. ते म्हणाले की, 'रुग्णसंख्या वाढणे हा चिंतेचा विषय आहे. लोकांचा प्रतिसाद मिळायला पाहिजे. मात्र लोकांचा निर्धास्तपणा हाच रुग्णसंख्या वाढण्याचे मुख्य कारण आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये जे निर्बंध सांगितले आहेत ते पाळायला हवेत अशी सरकारला जनतेकडून अपेक्षा आहे. लग्नाला गर्दी करु नयेत तसेच विनाकारण गर्दी करु नका, मास्क वापरा, सोशल डिस्टन्सिंग गोष्टींचं पालन केले पाहिजे'

बातम्या आणखी आहेत...