आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ग्राउंड रिपोर्ट:15 हजार लोकसंख्येच्या गावात कठोर उपाययोजना, कोरोना हॉटस्पॉट मुंबईत वसलेल्या गोराईने अनलॉकमध्येही महामारीला गावाबाहेर रोखले

मुंबई10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

  कोरोना हॉटस्पॉट मुंबईत वसलेल्या गोराईने अनलॉकमध्येही महामारीला गावाबाहेर रोखले

विनोद यादव | मुंबई

५० महिलांनी बॅरिकेड्स लावून सतत ठेवले लक्ष देशत कोरोनाचे सर्वात मोठे हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईच्या हद्दीत येणाऱ्या एका गावाने कोरोना महामारीविरुद्ध लढताना आदर्श निर्माण केला. आजवर या गावाने कोरोनाला गावात प्रवेशच करू दिला नाही. मुंबईत लॉकडाऊन असो की अनलॉक कोरोना इथे येऊ शकला नाही. मुंबई मनपाचा भाग असलेले गोराई गाव म्हणजे ५ किमी क्षेत्रात पसरेलला एक छोटा टापू आहे. येथील कोरोनाविरुद्धच्या संघर्षाचे श्रेय महिलांना जाते. सरपंच रोसी डिसुझा सांगतात, एस्सल वर्ल्ड, वॉटर किंगडम आणि ग्लोबल विपश्यना हे गोराईतच आहे. लॉकडाऊनमध्ये लोक येथे नजर चुकवून येत होते. त्यामुळे गावातील ३०-५० महिलांनी रस्त्यांत बॅरिकेडिंग करून २४ तास लक्ष ठेवले. दुसरीकडे गावातील युवकांनी ५-५चे गट करून तीन-तीन तासांची एक शिफ्ट करून लक्ष ठेवण्यासाठी गट तयार केले. मात्र, यादरम्यान अनलॉकची घोषणा झाली आणि चिंता वाढली. तरीही लोकांनी काळजी घेतली. बॅरिकेडिंग काढले, मात्र फिजिकल डिस्टन्सिंग काटेकोर पाळले जात आहे. याचा परिणाम असा झाला की, आजपर्यंत गावात एकही कोरोना पॉझिटिव्ह आढळलेला नाही. १५ हजार लोकवस्ती असलेले गोराई गाव ९०% कॅथॉलिकबहुल आहे. शेती हा प्रमुख व्यवसाय असून रविवारी गोराईत लोक मासे खरेदीसाठी मोठ्या संख्येने येतात. तरीही लोक कोरोनापासून सुरक्षित आहेत.

बातम्या आणखी आहेत...