कोरोना व्हायरसशी सामना करण्यासाठी संघाचे कार्यकर्ते सज्ज, केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीसाठी आम्ही कटीबद्ध- मोहन भागवत


  • कोरोनाग्रस्तांची संख्या 598 वर तर मृत्यू 11

दिव्य मराठी वेब टीम

Mar 25,2020 04:29:55 PM IST

मुंबई- कोरोना व्हायरसचाचा कहर सध्या राज्यासह देशभरात मोठ्या प्रमाणावर पसरत आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक राज्यांनी लॉकडाउनची घोषणा केल्यानंतर, अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशातच लॉकडाउनची घोषणा केली. यादरम्यान सामान्य नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. यासाठी आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पुढाकार घेतला आहे. आरएसएसचे राष्ट्रीय अध्यक्ष मोहन भागवत यांनी मदतीचे आवाहान केले आहे.

भागवत म्हणाले की, "कोरोनाविरोधातील लढ्यात केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीसाठी संघाचे कार्यकर्ते तयार आहेत. नागरिकांना लागेल ती मदत करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. पोलिस आणि प्रशासनाने यावर उपाय योजना करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. सरकारने दिलेल्या नियमांचे पालन सर्व नागरिकांनी करयला हवं. या संघर्षाच्या काळात समाजातील सर्व स्तरातील लोकांनी प्रशासनाने केलेल्या नियमाची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. औषध आणि अन्य इतर गरजेच्या वस्तू लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. त्यामुळे शक्य तितकं घरात राहा, आणि सोशल डिस्टंसींग पाळा, असेही भागवत म्हणाले.

संक्रमणाच्या 598 केस आणि 11 मृत्यू

देशातील राज्य सरकारांनी प्रसिद्ध केलेल्या आकड्यांनुसार, संक्रमितांची संख्या बुधवारी 598 झाली आहे. आतापर्यंत 11 लोकांचा मृत्यू झाला आहे. परंतु केंद्र सरकारने आतापर्यंत देशात 562 पॉझिटिव्ह आणि 512 ऍक्टिव्ह केस असल्याची माहिती दिली आहे. आज संक्रमणाच्या 62 नवीन केस समोर आल्या आहेत. पूर्वोत्तर भाग मिझोरममध्ये एक नवीन केस समोर आली आहे. येथे नेदरलँडवरून आलेला एक पादरी पॉझिटिव्ह आढळून आला आहे. यासोबतच कोरोना संक्रमण देशातील 25 राज्यांमध्ये पोहोचले आहे. या व्यतिरिक्त तामिळनाडूच्या मदुराईमध्ये सकाळी 54 वर्षीय संक्रमित रुग्णाच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या सर्वात जास्त 116 केस महाराष्ट्रमध्ये असून केरळ 109 संख्येने दुसऱ्या क्रमांकावर आहे.

X