आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबईमध्ये पुन्हा वाढेल कोरोना:नव्या रिसर्चमध्ये दावा - मुंबईमध्ये पुन्हा जानेवारी 2021 मध्ये येऊ शकते कोरोनाची लाट, सण-उत्सवांच्या काळात लोकांना अंतर ठेवण्याचा सल्ला

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • टाटा इंस्टिट्यूटचे डीन डॉ. संदीप जुनेजाचे म्हणणे आहे की, गणेशोत्सवप्रमाणे लोक दिवाळीमध्ये कमी भेटले तर संक्रमण कमी होईल
  • त्यांनी हे देखील म्हटले की, 2021 मध्ये शाळा आणि कॉलेज पुन्हा उघडल्याने रुग्णालयात दाखल होणाऱ्या लोकांची संख्या जास्त होणार नाही

मुंबईमध्ये कोरोना व्हायरस संक्रमणाची पुढची लाट जुलै आणि सप्टेंबरप्रमाणे पुन्हा समोर येऊ शकते. हा दावा मुंबईच्या कोलाबा येथील टाटा इंस्टिट्यूट ऑफ रिसर्चच्या वैज्ञानिकांनी केला आहे. एका रिसर्च रिपोर्टनुसार, मुंबईमध्ये स्लम आणि गैर स्लम लोकसंख्या मोठ्या प्रमाणात जानेवारी 2021 पर्यंत कोरोना व्हायरसच्या विळख्यात येऊ शकते.

रिपोर्टनुसार, 26 अक्टोबरपर्यंत उपलब्ध डाटाच्या विश्लेषणाच्या आधारावर मुंबईची 80 टक्के स्लम किंवा झोपडपट्टीमध्ये राहणारी लोकसंख्या आणि 55 टक्के गैर स्लम लोकसंख्या जानेवारी 2021 पर्यंत कोरोना व्हायरसने संक्रमित होऊ शकते. यासोबतच त्यांची हर्ड इम्युनिटी देखील विकसित होऊ शकते.

पहिल्याच्या तुलनेत यावेळी अधिक तीव्र होणार कोरोना
संशोधनात समोर आले की, नोव्हेंबरच्या पुर्वीचा आठवडा म्हणजे दिवाळीच्या एक किंवा दोन आठवड्यानंतर मुंबईमध्ये कोरोनाची लाट पुन्हा येऊ शकते. यादरम्यान रुग्णालयात दाखल होणाऱ्यांच्या संख्येमध्येही वाढ होऊ शकते. बीएमसीने देखील लोकांना सण उत्सवांच्या काळात सतर्क राहण्यास सांगितले आहे. हे देखील मानले जात आहे की, हे पहिल्या तुलनेत अधिक तीव्र असेल.

कमी भेटी झाल्या तर कमी होईल संक्रमण
टाटा इंस्टिट्यूटचे डीन डॉ. संदीप जुनेजा म्हणाले की, जर गणेशोत्सवाप्रमाणे लोक दिवाळीत कमी भेटले तर संक्रमण कमी होईल. कारण ऑगस्टमध्ये झालेल्या गणपती उत्सवाच्या तुलनेत मुंबईचे जास्तीत जास्त लोक आता कोरोना व्हायरसमुळे संक्रमित होत आहेत. लोकांनी व्हायरसच्या विरोधात एक प्रकारची इम्यूनिटी विकसित केली आहे.

नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान हे मूल्यांकन
अहवालानुसार नवीन अंदाज नोव्हेंबर आणि जानेवारी या दोन्ही बाबींचा विचार करून विकसित केला गेला आहे. अर्थव्यवस्था आणि लोकल गाड्या सर्वसामान्यांसाठी पूर्णपणे कार्यरत असतील असे गृहीत धरून याची रचना केली गेली आहे. तसेच 2021 मध्ये शाळा व महाविद्यालये पुन्हा सुरू केल्याने रुग्णालयात दाखल झालेल्यांची संख्या वाढणार नाही, असेही या पथकाने म्हटले आहे. रुग्णालयात भरती करण्यावर अधिक भर देताना डॉ. जुनेजा म्हणाले की, 1 नोव्हेंबरला रुग्णालयात दाखल होण्याची दुसरी लाट जानेवारी 2021 च्या तुलनेत मोठ्या प्रमाणात असेल.

बीएमसीसोबत मिळून हा सर्व्हे केला
TIFR ने तीन वार्डांमध्ये BMC सोबत सर्व्हे करत कोविड-19 च्या व्याप्तीचा अभ्यास केला. जुलैमध्ये केलेल्या एका संशोधनामध्ये स्लम एरियामध्ये 57 टक्के आणि गैर-स्लम वस्तींमध्ये 16 टक्के कोविड-19 प्रति अँटी बॉडीज होत्या, ज्या ऑगस्टमध्ये 42 टक्के आणि 18 टक्के होत्या.