आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
देशात कोरोना व्हायरसने पुन्हा डोके वर काढले आहे. देशभरातील 91 जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ झाली. त्यापैकी 34 जिल्हे एकट्या महाराष्ट्रातून आहेत. यासोबतच, कर्नाटकचे 16, हरियाणा, पंजाब, छत्तीसगड, गुजरात आणि बिहारच्या प्रत्येकी 4-4, आणि केरळमधील दोन जिल्ह्यांचा समावेश आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण बरे होण्याची संख्या देखील अधिक आहे.
एका दिवसात वाढले 4,412 सक्रीय रुग्ण
रविवारी देशभर 13,979 नवीन रुग्ण सापडले आहेत. तर 9,476 रुग्ण बरे झाले आहेत. अर्थातच 4,412 सक्रीय रुग्णांची वाढ झाली आहे. ही वाढ 87 दिवसांत सर्वाधिक आहे. तसेच रविवारी कोरोनामुळे 79 जणांचा मृत्यू झाला. तत्पूर्वी 25 नोव्हेंबर रोजी 7,234 अॅक्टिव्ह रुग्ण वाढले होते. अॅक्टिव्ह किंवा सक्रीय रुग्ण म्हणजे असे रुग्ण की ज्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
राज्यातील कोरोनाची आकडेवारी...
राज्यात रविवारी 6,971 लोक कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. 2,417 रुग्ण बरे झाले, तर 35 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. आतापर्यंत राज्यात 21 लाख 884 लोकांना कोरोनाची लागण झाली. त्यातील 19 लाख 94 हजार 997 लोक बरे झाले. तर 51 हजार 788 लोकांचा जीव गेला. 52 हजार 956 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.
लसिकरणात वेग आणण्याचे राज्यांना केंद्राचे निर्देश
राज्य सरकारांनी कोरोनाच्या व्हॅक्सीनेशन प्रक्रियेत वेग आणावा असे निर्देश केंद्र सरकारच्या वतीने देण्यात आले आहेत. सध्या अनेक राज्यांमध्ये आठवड्यातून दोनदा व्हॅक्सीनेशन केले जात आहे. सद्यस्थितीला केवळ कोरोनात फ्रंटफूटवर काम आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना व्हॅक्सीन दिले जात आहे. मार्चपासून 50 पेक्षा अधिक वय असलेल्या तसेच इतर रोग असलेल्या सामान्य नागरिकांना लस दिली जाणार आहे. केंद्राने यासाठी राज्यांना नियोजन करण्याचे निर्देश दिले आहेत.
कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रात आली? मुख्यमंत्री म्हणाले...
महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले. सोबतच, नागरिकांना गर्दी टाळणे, राजकीय कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रमांवर निर्बंध लावत असल्याचेही सांगितले आहे. 8 दिवसांत परिस्थिती आटोक्यात आली नाही तर पुन्हा लॉकडाउनची वेळ येईल असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला. लॉकडाउन नको असेल तर मास्क वापरा आणि गर्दी टाळा. खासगी कार्यालयांना सुद्धा वर्क फ्रॉम होम करण्याचे निर्देश दिले आहेत. महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आली का हे येत्या 8 ते 15 दिवसांत कळेल असेही मुख्यमंत्री म्हणाले आहेत.
वर्क फ्रॉम होमला प्राधान्य द्या
पुणे जिल्ह्यात नाइट कर्फ्यू लावण्यात आला आहे. अमरावतीत सुद्धा आजपासून लॉकडाउनची सक्ती केली जात आहे. केवळ अनावश्यक कामांना परवानगी देण्यात आली आहे. शाळा महाविद्यालये 28 फेब्रुवारीपर्यंत बंद करण्यात आले आहेत. अकोला, वाशिम, बुलडाणा आणि यवतमाळ इत्यादी जिल्ह्यांमध्ये निर्बंध लादण्यात आले आहेत. 23 फेब्रुवारीपासून अकोल्यात सुद्धा मर्यादित लॉकडाउन लागू केला जाणार आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.