आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्र कोरोना:राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 12 हजार 974 वर; पुण्यात 6 जणांचा आज कोरोनामुळे मृत्यू तर 63 नवीन रुग्ण

मुंबई2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • मराठवाडा : नांदेडात एकामहिलेचा मृत्यू, ५ नवे रुग्ण
  • पुणे विभागात ४६३ रुग्ण बरे, पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांची माहिती

राज्यातील कोरोनाचा विळखा अजून वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. रविवारी 678 रुग्णांची नोंद झाली होती. यासोबतच राज्यातील एकूण रुग्णसंख्या 12 हजार 974 झाली आहे. यापैकी 10 हजार 311 अॅक्टीवर रुग्ण आहेत, तर 2 हजार 115 रुग्ण ठीक झाले आहेत. रविवारी 27 रुग्णांचा मृत्यू झाला असू, एकूण बळींचा आकडा 548 वर गेला आहे. 

आज पुण्यात कोरोनामुळे एका पोलिस कर्मचाऱ्याचा बळी गेला आहे. 58 वर्षीय पोलिस कर्माचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. गेल्या 12 दिवसांपासून ते आयसीयूत होते. याआधी मुंबईत कोरोनामुळे 4 पोलिसांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. 

रत्नागिरी जिल्ह्यात आणखी 2 कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. कालपासून जिल्ह्यात 4 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली असून रत्नागिरीतील रुग्णांची संख्या 10 वरपोहचली आहे.  मुंबईहुन आलेल्या दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. हे रुग्ण मुंबईहून मंडणगडमध्ये चालत आले होते. यात एक पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. पुरुष रुग्ण  हा मंडणगडमधील तिढे गावातील आहे.  तर महिला रुग्ण  संगमेश्वर तालुक्यातील पूर  मधील आहे.  हि महिला संगमेश्वर येथे पतीच्या अंत्यसंस्काराला आली होती. यामुळे सध्या जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या 10 वर पोहोचली आहे.

मुंबई मनपा ८८००, ठाणे ५४८, मुंबई-ठाणे मंडळ मिळून १०२२३, नाशिक मंडळ ४१३, पुणे मंडळ १५४९, कोल्हापूर मंडळ ६१, औरंगाबाद मंडळ २९७, लातूर मंडळ ४७, अकोला मंडळ १९८, नागपूर १५८, इतर राज्ये २८.

मुंबईत २१ जणांचा मृत्यू

मुंबईत कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. धारावीत मागच्या २४ तासात ९४ रुग्ण वाढले. तर २ जणांचा मृत्यू झाला. धारावीत एकूण कोरोना रुग्णांची संख्या ५९० पोहोचली तर मृत्यू संख्या २१ वर गेली आहे.

माहिममधील एकूण रुग्णसंख्या ६८ वर पोहोचली तर इथे आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला. दादरमध्ये देखील ४ रुग्णांची वाढ झाल्याचे दिसून आले. दरम्यान एकाचा मृत्यू आहे. दादरमधील रुग्णसंख्या एकूण ५० वर पोहोचली आहे.

मराठवाडा : नांदेडात एकामहिलेचा मृत्यू, ५ नवे रुग्ण

नांदेड शहरात एका महिला रुग्णाच्या मृत्यूसह ५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे शहरातील रुग्णसंख्या ३१ झाली आहे. दरम्यान, लातूर जिल्ह्यातील उदगीर येथेही २ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील अॅक्टिव्ह रुग्णसंख्या १० झाली आहे. बीड, हिंगोली, परभणी, उस्मानाबाद व जालना या ५ जिल्ह्यांत रविवारी नवीन रुग्ण आढळला नाही.

नांदेड शहरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये सारी आजारावर उपचार घेत असलेल्या महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. या महिलेला शासकीय रुग्णालयात हलवत असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला. आणखी ४ जणांचे अहवालही पॉझिटिव्ह आले. त्यामुळे या रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना क्वॉरंटाइन केले जात आहे.

पुणे विभागात ४६३ रुग्ण बरे, पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांची माहिती

पुणे विभागातील ४६३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २ हजार १४७ झाली आहे. तर, ॲक्टिव्ह रुग्ण १ हजार ५७१ आहेत. विभागात कोरोनाबाधित एकूण ११५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच, ७२ रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली. दरम्यान, रविवारी पुण्यात ७ जणांचा मृत्यू झाला असून १३८ रुग्णांची नोंद झाली.

पुणे जिल्ह्यात २ हजार ५० बाधित रुग्ण असून ११५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्ह्यात ७४ बाधित रुग्ण असून २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्ह्यात ११४ बाधित रुग्ण असून ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्ह्यात ३३ बाधित रुग्ण असून १ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात १४ बाधित रुग्ण असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

अकोल्यात एकाच दिवसात आढळले १५ पाॅझिटिव्ह

अकोला शहरात रविवारी, ३ मे रोजी कोरोनाने कहर केला असून दिवसभरात विविध भागात तब्बल १५ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. एवढ्या संख्येने जिल्ह्यात पहिल्यांदाच पाॅझिटिव्ह रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता एकूण कोविडबाधितांचा आकडा अर्धशतकाच्या वर म्हणजे ५५ एवढा झाला आहे. तर रविवारी दोन रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे.

अकोलेकरांच्या चिंतेत आणखी वाढ करणारे रिपोर्ट रविवारी प्राप्त झाले आहेत. सकाळी १२ आणि सायंकाळी ३ असे एकूण १५ रिपोर्ट दिवसभरात पाॅझिटिव्ह आले आहेत. यातील दोन महिलांचा १ व २ मे रोजी मृत्यू झाला असून त्यांचे रिपोर्ट आज पाॅझिटिव्ह आले आहेत. त्या बैदपुरा व सिटी कोतवाली परिसरातील रहिवाशी असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. उर्वरित १३ रुग्णांमध्ये ७ बैदपुरा, ३ मोमीनपुरा व ३ न्यू भीमनगर रुग्णांचा समावेश आहे.

सोलापुरात १२८ वर रुग्णसंख्या

शहरातील कोरोनाबाधितांच्या संख्येत रविवारी १४ रुग्णांची भर पडली असून आता एकूण संख्या १२८ वर पोहोचली आहे. रविवारी आढळलेले सर्व रुग्ण प्रतिबंधित क्षेत्र व क्वारंटाईनमधील आहेत. त्यामध्ये एका नगरसेवकाच्या मुलासह त्या कुटुंबातील अन्य दोघांना बाधा झाली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला

नागपूर |राज्यातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग पोहोचला असताना महिनाभर कोरोनामुक्त राहिलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात शनिवारी पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने खळबळ माजली. चंद्रपूर शहरातील बंगाली कॅम्प परिसरातील कृष्णानगर भागातील एक ५० वर्षीय रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आल्यावर संपूर्ण परिसर तातडीने सील करण्यात आला. नागरिकांनी घाबरून न जाता अधिक जबाबदारीने लॉकडाऊन पाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले.

सातारा जिल्ह्यात एकूण संख्या ७७

सातारा | क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे येरवडा कारागृहातून सातारा मध्यवर्ती कारागृहात प्रवास करून आलेले २ कैदी (वय ३१ व ५८) व उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथे बाधित रुग्णाचे निकट सहवासित १ (वय ६) असे एकूण ३ नागरिकांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून ते कोरोना बाधित असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. आतापर्यंत सातारा जिल्ह्यात ७७ करोनाबाधित आढळून आले आहेत. कालही दोन कैदी सातारा कारागृहात कोरोना बाधित आढळले होते

तर क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील ४०, ग्रामीण रुग्णालय कोरेगाव येथील १६ अशा ५६ नागरिकांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आहेत. आता सातारा जिल्ह्यात ६६ रुग्ण कोरोना बाधित असून आतापर्यंत ९ कोरोना मुक्त होऊन रुग्णालयातून सोडले आहेत तर २ जणांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात एकूण ७७ बाधित रुग्ण आढळले आहेत.

जळगाव : एकूण रुग्ण ५० वर

जिल्ह्यात काेराेना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत अाहे. रविवारी अाणखी ७ रुग्णांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला. जिल्ह्यातील काेराेनाबाधितांची संख्या ५२ वर पोहोचली. यात अमळनेर येथील ३, पाचोरा येथील २ तर जळगाव आणि अडावद (ता. चोपडा) येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. दरम्यान, जळगाव शहरातील पॉझिटिव्ह आलेल्या तरुणाचा रविवारी मृत्यू झाला. येथील कोविड रुग्णालयात स्वॅब घेतलेल्या ७६ कोरोना संशयित व्यक्तीचे तपासणी अहवाल रविवारी सायंकाळी प्राप्त झाले.त्यातील ६८ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह अाले तर एकाचा अहवाल रिजेक्ट केला. तर सात जण काेराेना पाॅझिटिव्ह आले.

बातम्या आणखी आहेत...