आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लसीकरण:आरोग्य मंत्री टोपे म्हणाले - व्हॅक्सीन मिळाली तरच सर्वांचे लसीकरण होऊ शकेल, व्हॅक्सीन निर्मात्यांनी दिले नाही कोणतेही उत्तर

मुंबई9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लस निर्मात्यांनी दोन दिवस जाऊनही कोणतेही उत्तर दिले नाही

महाराष्ट्रात 1 मेपासून 18 वर्षांच्या वरील सर्व लोकांना लसीकरणाच्या संभवानांना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जवळपास फेटाळून लावले आहे. टोपे मंगळवारी म्हणाले की, 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना लस दिली जाणार की नाही, यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. त्यांनी म्हटले की, 1 ला व्हॅक्सीन गरजेनुसार उपलब्ध होणे आवश्यक आहे. तेव्हाच 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांचे लसीकरण शक्य होईल.

लस निर्मात्यांनी दोन दिवस जाऊनही कोणतेही उत्तर दिले नाही
टोपे म्हणाले की, राज्यात 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांची एकूण लोकसंख्या 5 कोटी 71 लाख आहे. राज्यात लस मोफत द्यायची आहे की, त्यासाठी कॅटेगिरी बनवायची आहे यावर चर्चा सुरू आहे. व्हॅक्सीनेशनसाठी व्हॅक्सीनची उपलब्धता हे मोठे आव्हान आहे. कारण आम्ही सीरम, बायोटेकला पत्र लिहिले आहे. दोन दिवस झाले मात्र अद्याप आम्हाला कोणतेही उत्तर मिळालेले नाही.

राजेश टोपे म्हणाले की, एवढ्या मोठ्या संख्येत लसीकरणासाठी व्हॅक्सीन गरजेनुसार उपलब्ध असणे आवश्यक आहे. सर्व राज्यांमध्ये एकाच दिवसात व्हॅक्सीनेशन सुरू होऊ शकेल, यावरही शंका आहे. अनेक राज्य अजुनही यासाठी तयार नाहीत. लसींच्या उपलब्धतेविषयी अनेक अडचणी आहेत. कोविन अॅपमध्ये नाव रजिस्टर करावे लागेल. मात्र सध्याच्या स्थितीमध्ये व्हॅक्सीनच्या गरजेनुसार उपलब्धा होईल यावर पूर्ण विश्वास नाही.

प्रत्येकाला मोफत लस देण्याबाबत मंत्रिमंडळ चर्चा करेल
सर्वांना मोफत दिल्यास 7.5 हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याचे टोपे यांनी सांगितले. प्रत्येकाला लस मोफत देण्याबाबत मंत्रिमंडळात चर्चा होणार आहे. संपन्न आणि श्रीमंत वर्गाला मोफत डोस देण्याऐवजी कमी दरात देण्याच्या बाजूने मत असल्याचेही ते म्हणाले. तसेच काल महाराष्ट्रात 5 लाख 34 हजार 372 लोकांना लस देण्यात आली. हे रेकॉर्ड ब्रेक लसीकरण एका दिवसात नोंदवण्यात आले. आतापर्यंत दीड कोटीहून अधिक लोकांना लस देण्यात आली आहे. यासह, लसच्या बाबतीत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे.

राज्यात फक्त 2% व्हॅक्सीन वेस्टेज
टोपे यांनी सांगितले की राज्यात लसीचे वेस्टेज 2% आहे, जो इतर राज्यांपेक्षा खूपच कमी आहे. ते म्हणाले की, एका दिवसात 8 लाख लोकांना लसी देण्याची क्षमता आहे. आरोग्यमंत्री म्हणाले की, लवकरच राज्यातील ऑक्सिजन, रेमेडिसिविर, लसांचा एकूण डेटा दिला जाईल.

बातम्या आणखी आहेत...