आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लसीच्या तुटवड्यावरुन वाद:...तर सिरमच्या लसीचा एक थेंब देखील महाराष्ट्राबाहेर जाऊ देणार नाही, राजू शेट्टींचा थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना इशारा

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यात लसींचा तुटवडा असल्याचे वृत्त दिले होते.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे राज्यातील लसीकरण मोहीम मंद गतीने सुरू आहे. अनेकांना लसीकरण केंद्रांवरुन लस नसल्यामुळे परत पाठवले जात आहे. अनेक लसीकरण केंद्रेही बंद करण्यात आली आहे. लसी देण्याच्या मुद्द्यावरून केंद्र आणि राज्य सरकारमध्ये वाक् युद्ध सुरू आहे. आता यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी देखील उडी घेतली आहे. त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनाच इशारा दिला आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांना लिखित इशारा दिला आहे. 'महाराष्ट्रात सर्वात जास्त रुग्ण आहेत, देशात सापडणाऱ्या रुग्णांमधून अर्धे रुग्ण हे महाराष्ट्रातील असताना महाराष्ट्राला लसींचा योग्य पुरवठा का केला जात नाही. महाराष्ट्राला सापत्न वागणूक का दिली जात आहे? आपण पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांना पत्र लिहिले आहे. एका आठवड्यात महाराष्ट्राच्या लस पुरवठ्यात वाढ करण्यात आली नाही, तर सीरम इन्स्टिट्यूटमधून इतर राज्यात लस घेऊन जाणारी वाहने बाहेर पडू देणार नाही' असा इशारा राजू शेट्टी यांनी मोदी आणि केंद्रीय आरोग्यमंत्री यांना दिला आहे.

कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी लस मिळवण्याच्या धडपडीत लसीचा तुटवडा जाणवत आहे. अनेक ठिकाणी लसीकरण केंद्रे बंद करावी लागली. दरम्यान केंद्र आणि राज्य सरकारमध्ये वाद सुरू आहे. आपले अपयश झाकण्यासाठी महाराष्ट्र सरकार केंद्रावर आरोप करत असल्याचे आरोग्यमंत्री हर्षवर्धन म्हणाले होते. यानंतर राजेश टोपे यांनी स्पष्टीकरण देत आम्ही केंद्राने सांगितलेले सर्व नियम पाळत असल्याचे सांगितले होते. तसेच महाराष्ट्रासोबत केंद्राकडून दुजाभाव केला जात असल्याचा आरोप केला होता.

बातम्या आणखी आहेत...