आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Cororna Effect | Ganapati Festival Without Processions This Year; Chief Minister's Appeal To Ganesh Mandals To Celebrate With Simplicity

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गणेशोत्सव:यंदा मिरवणुकांविनाच गणेशोत्सव; साधेपणाने साजरा करण्याचे मुख्यमंत्र्यांचे गणेश मंडळांना आवाहन

मुंबई10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • परंपरा खंडित होणार नाही याची काळजी घेत जगाला हेवा वाटेल असा गणेशोत्सव साजरा करू - मुख्यमंत्री

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांसोबत बैठक घेतली. यंदाचा उत्सव हा धूमधडाक्यात साजरा करता येणार नाही, त्यामुळे गर्दी तसेच मिरवणुकाही काढता येणार नाहीत. कोरोनामुळे सर्व प्रकारची दक्षता घेऊनच हा उत्सव साधेपणाने साजरा करावा लागेल, असे मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत स्पष्ट केले.

आपण महाराष्ट्रात ‘पुनश्च हरिओम’ करीत आहोत. प्रत्येक पाऊल हे सावधतेने टाकत आहोत. त्यामुळे हा उत्सव साजरा करतानादेखील आपल्याला चौकटीत राहून उत्सव साजरा करावा लागेल. कोणत्याही परिस्थितीत परंपरा खंडित होणार नाही याची काळजी आपण घेऊ, पण सामाजिक भान ठेवावेच लागेल. जगाला हेवा वाटेल असा गणेशोत्सव साजरा करू, असेही मुख्यमंत्र्यांनी या वेळी स्पष्ट केले. तसेच गणेश मंडळांमार्फत सामाजिक जनजागृती कशी केली जाईल याचा विचार करून हा उत्सव साजरा करू, असे आवाहनही त्यांनी केले. राज्यातल्या गणेश मंडळांनी यंदा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे ठरवले आहे. तसेच शासन जो निर्णय घेईल तो मान्य करण्याची ग्वाहीही गणेश मंडळांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...