आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकॉर्पोरेट हाऊसेस आणि विविध कंपन्यांनी गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्रात सर्वाधिक सीएसआर निधी खर्च केला आहे. २०१९ ते २०२१ या वर्षात महाराष्ट्र आणि त्याच्या शेजारील राज्यामध्ये विविध कंपन्यांनी सीएसआर निधीतून एकूण १४,२१९.०८ कोटी रुपये खर्च केले. त्यापैकी ४७.६५% टक्के म्हणजे ६७७५.१३ कोटी रुपये एकट्या महाराष्ट्रात खर्च झाले आहेत.
औरंगाबादमध्ये १३९ कोटी तर नाशिकमध्ये १०८ कोटी रुपये करण्यात आले खर्च महाराष्ट्रात सीएसआर अंतर्गत गेल्या दोन वर्षात खर्च करण्यात आलेल्या एकूण ६७७५.१३ कोटी रुपयांपैकी सर्वाधिक १३९.०५ कोटी रुपये मुंबई आणि पुण्यानंतर औरंगाबादमध्ये खर्च करण्यात आले. मुंबईत ६६९.२९ कोटी तर पुण्यात ७०८.१७ कोटी रुपये खर्च करण्यात आले. दोन वर्षांत महाराष्ट्राची उपराजधानी नागपुरात सीएसआरमधून केवळ ९२.०४ कोटी रुपये खर्च झाले. त्याचप्रमाणे नाशिकमध्ये १०८.४३ कोटी, जळगावमध्ये ५.२२ कोटी, अकोल्यात २.०४ कोटी, सोलापूरमध्ये ३७.५५ कोटी आणि अहमदनगरमध्ये ४३.०२ कोटी रुपये सीएसआर फंडातून विविध सामाजिक कामांवर कंपन्यांनी २०१९ ते २०२१ दरम्यान खर्च केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.