आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समुद्राखाली बनेल देशात पहिला 7 किमीचा बोगदा:मेसर्स फॅकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडची कमी बोली

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामांना आता महाराष्ट्रातही वेग आला आहे. मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरअंतर्गत २१ किमी लांबीचा बोगदा बांधण्यात येणार आहे. त्यात देशातील पहिल्या ७ किमी लांबीच्या समुद्राखालील बोगद्याचाही समावेश आहे. शुक्रवारी या कामासाठी तांत्रिकदृष्ट्या पात्र बोलीदारांच्या आर्थिक निविदाही उघडण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये मेसर्स फॅकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने सर्वात कमी बोली लावली आहे.

बुलेट ट्रेनसाठी महाराष्ट्रातील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) ते शिळफाटा (ठाणे) पर्यंत भूमिगत स्टेशन बांधले जाईल. यामध्ये ७ किमी लांबीचा बोगदा समुद्राखाली बांधण्यात येईल. समुद्राच्या आत इतका लांब बांधलेला हा देशातील पहिला बोगदा असेल. हे टर्मिनल २ ट्रॅक असलेले सिंगल ट्यूब टर्मिनल असेल. ज्यामध्ये बुलेट ट्रेनचे आगमन व प्रस्थान या दोन्ही मार्गांचा समावेश असेल. तसेच ३७ ठिकाणी ३९ उपकरण कक्षही बांधण्यात येईल.

हा बोगदा बांधण्यासाठी १३.१ मीटर व्यासाचे कटर हेड असलेले टीबीएम वापरले जातील. महत्त्वाचे म्हणजे एमआरटीएस-मेट्रो प्रणालीमध्ये वापरल्या जाणाऱ्या शहरी बोगद्यांसाठी साधारणपणे ५-६ मीटर व्यासाचे कटर हेड वापरले जातात. सुमारे १६ किमी बोगद्याच्या भागासाठी तीन टनेल बोअरिंग मशीन वापरल्या जातील आणि उर्वरित ५ किमी न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग पद्धतीद्वारे (एनएटीएम) होतील. हा बोगदा जमिनीपासून सुमारे २५ ते ६५ मीटर खोल असेल. सर्वात खोल बांधकाम बिंदू शिळफाटाजवळ पारसिक टेकडीच्या खाली ११४ मीटर असेल. बोगद्याचे बांधकाम सुलभ करण्यासाठी ३ शाफ्टचा वापर होईल.