आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Covid 19 Lockdown | Maharashtra | Marathi News | Lockdown It Was Good That Lockdown Was Not Announced This Time Ncp Nawab Malik Took A Dig On Narendra Modi

मलिकांचा टोला:बरे झाले यावेळी पंतप्रधानांची लॉकडाऊनची घोषणा केली नाही; नवाब मलिकांचा मोदींना टोला

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोरोनाच्या परिस्थितीवरती राज्यातील मुख्यमंत्र्यांशी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नबाव मलिक यांनी टोलेबाजी केली आहे. यावेळी लॉकडाऊनची घोषणा केली नाही, मागच्या वेळी लोकांना विश्वासात न घेता तसेच कोणताही विचार न करता लॉकडाऊनची घोषणा केली होती. असे म्हणत मलिकांनी मोदींवर हल्लाबोल केला.

उत्तर प्रदेशाची विधानसभा निवडणुक काही महिन्यांवरच ठेपली असताना, योगी सरकारमधील अनेक मंत्री भाजपला रामराम ठोकत आहे. पाच वर्षांचे अहंकारी सरकार हे एक कारण यामागे आहे. अशी टीका देखील मलिकांनी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. त्यावर मलिक यांनी आपले भाष्य केले. ते म्हणाले की, लॉकडाऊन लागतो की काय अशी भीती लोकांच्या मनात आहे. मात्र, ही एक चांगली गोष्ट आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करताना, स्थानिक पातळीवरील सद्यस्थितीवर राज्यांना यासंबंधी निर्णय घेण्यास सांगितले.

मागील वेळी कोणताही विचार न करता आणि लोकांना विश्वासात न घेता लॉकडाउनची घोषणा केली होती, असा टोला मलिक यांनी लगावला. यावेळी कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे. मात्र, लोक खबरदारी घेत आहेत. त्यामुळे हे एक बरे झाले की लॉकडाउनची घोषणा केली नाही, असेही ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...