आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्धव ठाकरे म्हणाले:मेडिकल कोअरमध्ये काम केलेल्या निवृत्त सैनिक, प्रशिक्षित नर्स, वॉर्ड बॉय यांची महाराष्ट्राला गरज; येथे मेल करा

मुंबई3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सर्दी, खोकला आणि ताप असलेल्यांना ठराविक रुग्णालयांमध्येच जावे -मुख्यमंत्री

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी सोशल मीडियावरून थेट संवाद साधला. यामध्ये त्यांनी कोरोना विरोधात लढणाऱ्या प्रशासकीय यंत्रणेला धन्यवाद म्हटले. त्यांनी कोरोना विरोधी व्यूहरचना आखताना रुग्णालयांची तीन भागात विभागणी केली जाणार असल्याचे घोषित केले. सोबतच, मेडिकल कोअरमध्ये काम केलेल्या निवृत्त सैनिक आणि प्रशिक्षित तसेच काम करण्यास इच्छुक नर्स, वॉर्ड बॉय यांना पुढे येउन या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन केले. इच्छुकांसाठी त्यांनी एक ईमेल आयडी सुद्धा जारी केला आहे.

प्रशिक्षित नर्स, वॉर्ड बॉय सैनिकांसाठी विशेष ईमेल आयडी
महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढण्यात गुणाकार सुरू झालेला आहे. त्यामुळे, या युद्धात आपल्याला आता जास्तीत-जास्त योद्धांची गरज आहे. यामध्ये लष्करातील निवृत्त सैनिक आणि अधिकारी ज्यांना मेडिकल कोअरचा अनुभव आहे. निवृत्त नर्स किंवा वॉर्ड बॉय आणि असे वैद्यकीय प्रशिक्षण मिळवलेले नर्स आणि ब्रदर ज्यांना रुग्णालयात जागा नसल्याने काम मिळाले नाही. यापैकी ज्यांची कोरोनाविरुद्ध युद्धात सहभागी होण्याची इच्छा आहे. त्यांनी covidyoddha@gmail.com  या ईमेल आयडीवर संपर्क साधा. परंतु, कृपा करून कुणीही गरज नसताना यावर मेल पाठवू नका. विनाकारण ई-मेल पाठवून ही ई-मेल आयडी ब्लॉक करू नका असे आवाहन सुद्धा मुख्यमंत्र्यांनी केले.

रुग्णालयांची तीन भागांत विभागणी
आतापासून मुख्यमंत्र्यांनी रुग्णांसाठी रुग्णालयांची तीन भागांमध्ये विभागणी केली आहे. या सर्व फीव्हर रुग्णालयांची माहिती लवकरच जारी केली जाईल. सर्दी खोकला आणि ताप असलेल्यांनीच याच रुग्णालयात जावे. फीव्हर क्लिनिकमध्ये तपासणी झाल्यानंतर मार्गदर्शन केले जाईल. त्यात एक म्हणजे, कोविड हॉस्पिटल सौम्य लक्षणे असतील त्यांच्यासाठी एक हॉस्पिटल, अधिक तीव्र लक्षणे असतील त्यांच्यासाठी दुसऱ्या टप्प्याचे हॉस्पिटल आणि तिसऱ्या ठिकाणी असलेले हॉस्पिटल पूर्णपणे अतिशय गंभीर अशा कोरोना रुग्णांसाठी असेल. हृदयविकार, रक्तदाब आणि मधुमेह असलेल्या कोविड-19 रुग्णांना हाय रिस्क पेशंट मानले जात आहे. त्यांच्यासाठी तिसऱ्या प्रकारचे रुग्णालय असेल.

घरात राहा पण आरोग्याची काळजी घ्या
घरात राहून सर्वांनाच काही ना काही चविष्ट आणि नवीन खाण्याची इच्छा होत असते. घरीच राहून खा, खाण्यावर बंधने नाहीत. परंतु, कोरोनामध्ये जे हाय रिस्क लोक आहेत ते मधुमेही आणि रक्तदाबाचा त्रास असलेले लोक आहेत. त्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यायलाच हवी. आपण काय खावे आणि काय खाऊ नये यावर लक्ष द्यावे.

विशेष पीपीईंची केवळ महाराष्ट्र नाही, तर इतर राज्ये आणि अमेरिकेतही कमतरता
देशात आणि महाराष्ट्रात पीपीई या विशेष गणवेशांची डॉक्टरांकडून मागणी केली जात आहे. पंरतु, केवळ पीपीईच नव्हे, तर मास्क आणि सॅनिटायझरसह अनेक गोष्टींचा तुटवडा आहे. शेजारील राज्य गुजरात असो की अमेरिका सर्वांना अशा गोष्टींची कमतरता भासत आहे. अमेरिकेला आपण औषधी पाठवत आहोत ही गोष्ट असे मुख्यमंत्र्यांनी समजावून सांगितले. पीपीई हे एक विशेष बुलेटप्रूफ जॅकेटप्रमाणेच एक विशेष गणवेश आहे. हा काही शिवता येत नाही. लवकर तयार करता येत नाही. तो पूर्णपणे सील करावा लागतो. त्याचे कापड देखील वेगळे असते असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...