आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना अपडेट:कोरोनापासून बचाव करण्यासाठी पर्वत उचलून आणण्याची गरज नाही, तुम्ही घरातच राहिलेले पुरे -उपमुख्यमंत्री

मुंबई3 वर्षांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
  • हनुमान जयंती आणि शब-ए-बरातला घरातच राहण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे आवाहन

कोरोनापासून बचाव करण्यासाठी आजच्या स्थितीला पर्वत उचलून आणण्याची गरज नाही. तुम्ही घरात राहा तेवढेच पुरे आहे असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत. राज्यासह देशभर कोरोना व्हायरसमुळे लॉकडाउन सक्तीने लागू केला जात आहे. अशात सर्वांनी पुढील आदेश येत नाही तोपर्यंत घरातच राहून आपले उत्सव साजरे करावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे हॉटस्पॉट बनलेले परिसर आणि गाव सील करण्यात आले आहेत. अशात नागरिकांनी नियमांचे पालन केले नाही तर त्यांना तुरुंगात डांबले जाईल असा इशारा अर्थमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. अजित पवार यांनी घरात हनुमान जयंती साजरे करण्याचे आवाहन करताना रामायणातील एका प्रसंगाची आठवण करून दिली. ते म्हणाले, "आजच्या स्थितीला एखाद्याला कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी कुणालाही पर्वत उचलून आणण्याची गरज नाही. तुम्ही घरात बसा तेवढेच पुरे आहे." रामायणमध्ये प्रभी श्री रामांचे बंधू लक्ष्मण जखमी झाल्यानंतर त्यांना पुनरजीवित करण्यासाठी संजीवणी बूटी आवश्यक होती. ती संजीवणी आणण्यासाठी भगवान राम यांचे परमभक्त हनुमान संजीवणी आणण्यासाठी गेले होते. परंतु, संजीवणी बूटी नेमकी कोणती हे कळत नसल्याने त्यांनी संबंधित पर्वतच उचलून आणले होते. त्याच प्रसंगावरून अजित पवार बोलत होते. दरम्यान, हनुमान जयंतीसह शब-ए-बरात सुद्धा लॉकडाउनमध्येच येत आहे. यामध्ये मुस्लिम समुदायात पूर्वसंध्येला नमाज अदा करून दुसऱ्या दिवशी पहाटे कब्रस्तानाला भेट दिली जाते. यात आपले हयात नसलेल्या मित्र-परिवाराच्या सदस्यांच्या कब्रींवर जाउन विशेष विधी केला जातो. परंतु, लॉकडाउन लागू असताना मुस्लिमांनी सुद्धा शब-ए-बरात घरातच राहून करावी. कब्रस्तानाला भेट देण्यासाठी जाउ नये असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...