आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराठाणे येथील एका 90 वर्षीय आजीबाईंचा कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यांना येथील रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती बुधवारी डॉक्टरांनी दिली. यासोबतच जिल्ह्यात आणखी एका 7 वर्षीय मुलासह 121 नवीन रुग्ण सापडले आहेत. मंगळवारी रात्री उशीरापर्यंत ठाणे येथील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 1399 झाली आहे. ठाणे जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना व्हायरसमुळे 38 जणांचा मृत्यू झाला आहे.
ठाणे जिल्ह्यात सापडलेल्या कोराना अर्थात कोव्हिड-19 रुग्णांमध्ये ठाणे महापालिका हद्दीतील 452, नवी मुंबईतील 395, कल्याण-डोंबिवलीतील 224, मीरा-भायंदरचे 189, ठाणे ग्रामीणचे 50, बदलापूरचे 42, भिवंडी निझामपूरचे 20, उल्हासनगरचे 16 आणि अंबरनाथ महापालिका हद्दीतील 11 जणांचा समावेश आहे. कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत काम करणाऱ्या किंवा राहणाऱ्यांना 8 मे पर्यंत कल्याण डोंबिवलीत प्रवेश किंवा त्यातून बाहेर पडता येणार नाही. भिवंडीतील भाजप खासदार कपिल पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आवाहन केले आहे, की त्यांनी कापड गिरण्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या राहण्याची व्यवस्था त्यांच्या कामाच्या ठिकाणीच करावी. मीरा भायंदरमध्ये सोमवारपासूनच अत्यावश्यक सेवांची दुकाने उघडण्यात आली होती. त्यात मंगळवारी नवीन आदेश काढून झेरॉक्सच्या दुकांना सुद्धा परवानगी देण्यात आली. या सुविधेने मुंबईत अडकलेल्या कामगारांना आपली कागदपत्रे गोळा करून त्यांच्या गावी पाठवण्याची व्यवस्था केली जात आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.